शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

महिला सुरक्षा महत्त्वाची

By admin | Updated: March 1, 2017 05:56 IST

मुंबई उपनगरीय लोकलमधून दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात.

मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलमधून दिवसाला ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यात २२ टक्के महिला प्रवासी असून, त्यांची सुरक्षा अधिक गरजेची आहे आणि त्यावर भरही दिला पाहिजे, असे मत वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तलिना जॉर्जिवा यांनी व्यक्त केले. जॉर्जिवा यांनी चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास दुसऱ्या श्रेणीच्या महिला डब्यातून केला. त्या वेळी जॉर्जिवा यांनी महिला प्रवासी तसेच पत्रकारांशीही संवाद साधला. ख्रिस्तलिना जॉर्जिवा या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. मुंबईतील विविध प्रकल्पांना वर्ल्ड बँकेकडून निधी दिला जातो. त्या कामाची माहिती त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. यात एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचाही समावेश आहे. जॉर्जिवा यांनी सकाळी पावणे दहाच्या सुमारास चर्चगेट येथून प्रवासास सुरुवात केली. त्या वेळी त्यांनी काही महिला प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना मिळणाऱ्या सुविधा, सुरक्षा याची माहितीही रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेतली. या वेळी त्यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुरक्षेमध्ये सुधारणेचा आग्रहदेखील धरला. जास्तीतजास्त आणि चांगल्या दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्थानकातील रोशणाईत सुधारणा करणे, ट्रेनमध्ये पोलिसांचे संख्याबळ वाढविणे इत्यादी उपाय केल्यावर महिला प्रवाशांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होईल, अशी आशा व्यक्त केली. महिला प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असून, ती वाढविण्यावरही शासनाने भर दिला पाहिजे आणि त्याचा अधिकाधिक वापरही महिला प्रवाशांनी करायला हवा. त्यामुळे महिला प्रवाशांचा प्रवासही सुरक्षित होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठीही अधिक लक्ष आमच्याकडून दिले जाईल आणि त्यासाठी रेल्वेकडेही बोलणी करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)>महिलांची संख्या मोठीलोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या ही मोठी आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून दररोज एकूण १६ लाख महिला प्रवासी प्रवास करतात. यामध्ये ८ लाख ५८ हजार मध्य रेल्वेवरील तर ७ लाख ५0 हजार पश्चिम रेल्वेवरील महिला प्रवाशांचा समावेश आहे. वर्ल्ड बँकेच्या सीईओ यांनी चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास करून महिला प्रवाशांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे एमयूटीपी-२ आणि एमयूटीपी-३ प्रकल्पांची कामे याबाबतची माहितीही त्यांना देण्यात आली. - प्रभात सहाय (एमआरव्हीसी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)एमआरव्हीसी आणि टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्याकडून नुकतेच महिला प्रवाशांबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी २५ टक्के महिला प्रवाशांंनी प्रवासात छळवणूक होत असल्याचे सांगितले होते.वर्ल्ड बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तलिना जॉर्जिवा मुंबईभेटीवर आल्या आहेत. मंगळवारी त्यांनी लोकलने प्रवास करून महिला प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या.