शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महिला आमदाराने पोलिसांत जमा केली लाचेची रक्कम!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:12 IST

विक्रोळी; मुंबई येथील एका एसआरए गृहनिर्माण प्रकल्पासंबंधी गप्प बसण्यासाठी एका बिल्डरने आपल्याला एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करणारे आरटीआय कार्यकर्ते संदीप येवले यांनी त्यातील चार लाखाची रक्कम काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना देऊन सदर प्रकरणास विधानसभेत वाचा फोडण्याची विनंती केली.

मुंबई : विक्रोळी; मुंबई येथील एका एसआरए गृहनिर्माण प्रकल्पासंबंधी गप्प बसण्यासाठी एका बिल्डरने आपल्याला एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करणारे आरटीआय कार्यकर्ते संदीप येवले यांनी त्यातील चार लाखाची रक्कम काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांना देऊन सदर प्रकरणास विधानसभेत वाचा फोडण्याची विनंती केली. स्वत: ठाकूर यांनीच आज हा गौप्यस्फोट केला. तसेच चार लाखाची रक्कम त्यांनी कफपरेड पोलीस ठाण्यात सायंकाळी जमा केली.आ. ठाकूर यांनी पत्रकारांना सांगितले की, मी मनोरा आमदार निवासातून विधानभवनाकडे येत असताना येवले माझ्याजवळ आले आणि त्यांनी एक कोटीच्या लाचप्रकरणाची माहिती आपल्याला दिली. हा पैसा सरकारला परत करण्याची आपली इच्छा आहे पण ती कोणीही स्वीकारत नाही.तेव्हा आपण हे प्रकरण विधानसभेत उचला असे सांगत येवले यांनी आपल्याला चार लाख रुपये दिले. येवलेंकडील लाचेची संपूर्ण रक्कम सरकारने आपल्या तिजोरीत जमा करायला हवी, अशी आपलीही मागणी आहे. त्यांनी आपल्याला दिलेले चार लाख रुपये आपण पोलीस ठाण्यात जमा केले आहेत, असे ठाकूर यांनी सांगितले. या लाच प्रकरणी सरकारने संबंधित बिल्डरला तातडीने अटक करावी या मागणीसाठी अपक्ष आमदार बच्चू कडू आणि संदीप येवले यांनी काही समर्थकांसह आज विधानभवनाबाहेर घोषणाबाजी केली. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. यशोमती ठाकूर यांनी हे गौप्यस्फोट विधानसभेतही करण्याचा प्रयत्न केला.