शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या न्यायाला महिला व बाल विकास विभागाचाच खो!

By admin | Updated: March 7, 2016 01:53 IST

राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बाल विकास विभागानेच न्यायदानाच्या कामापासून फारकत घेतली आहे.

हिनाकौसर खान-पिंजार ,  पुणे राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या महिला व बाल विकास विभागानेच न्यायदानाच्या कामापासून फारकत घेतली आहे. महिलांच्या तक्रारी निपक्षपाती सोडविण्यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाची राज्यातील व्याप्ती वाढावी म्हणून प्रस्तावित करण्यात आलेल्या ६ विभागीय कार्यालयांना पाठिंबा देण्याऐवजी विभागाने तो फेटाळला आहे. त्यामुळे मुंबईपासून दूर असलेल्या ग्रामीण भागातील पीडित महिलांना आजही हे आयोग एक स्वप्नच राहिले आहे.समाजात वावरत असतांना स्त्रीला कुठेना कुठे अन्यायाला सामोरे जावेच लागते. अशा अन्यायग्रस्त, पीडित महिलांच्या तक्रारीवर लवकरात लवकर सुनावणी होऊन त्यांना न्याय मिळावा, यासाठी राज्य महिला आयोगाची स्थापना झाली. मात्र, सद्य:स्थितीत महिला आयोगाचे केवळ मुंबई येथेच कार्यालय आहे. त्यामुळे पीडित महिलांना तक्रार नोंदवण्याकरिता मुंबईत जावे लागते. अनेकांना हे परवडणारे नाही. त्यामुळे त्या आयोगाकडे दादच मागत नाही. ही बाब लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने २०१० मध्येच महिला व बाल विकास विभागाकडे विभागीय कार्यालये सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. आयोगाचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण राज्य आहे. मुंबई वगळता अन्य ठिकाणी त्याचे कोणतेही कार्यालय नाही. त्यामुळे राज्यात मुख्यालयातून नियंत्रण ठेवणे प्रशासकीयदृष्ट्या शक्य होत नाही,तसेच खेडोपाडीच्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत तत्काळ कार्यवाहीही शक्य होत नसल्याने विभागीय कार्यालये सुरू होणे आवश्यक असल्याचे आयोगाच्या प्रस्तावात स्पष्ट केले आहे. सध्या महिलांच्या अन्याय, अत्याचार व संरक्षणाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून २९५ समुपदेशन मदत केंद्राच्या मदतीने कामे करावी लागत असल्याने आयोगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागीय कार्यालय असावे, असेही म्हटले आहे. राज्य महिला आयोगाने ५ वर्षांपूर्वीच यासंबंधीचा प्रस्ताव महिला व बाल विकास विभागाकडे पाठवला, मात्र विभागाने त्यावर टाळाटाळची भूमिका घेतली. आयोगाने घेतलेल्या पाठपुराव्यावर शेवटी विभागाने सप्टेंबर २०१५मध्ये प्रचलित यंत्रणा व क्षेत्रीय यंत्रणा यांमध्ये संघर्ष तयार होईल व आयोगाचा हेतू साध्य होणार नाही, असे उत्तर देत प्रस्ताव फेटाळला आहे.