शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ग्लॅमरस ‘हॉटेल मॅनेजमेंट’

By admin | Updated: May 30, 2016 02:07 IST

हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ‘जेवण बनवणे’ असा गैरसमज पूर्वी असायचा

मुंबई : हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे ‘जेवण बनवणे’ असा गैरसमज पूर्वी असायचा. पण आता हा गैरसमज पुरता दूर झाला आहे. या अभ्यासक्रमाला वेगळेच ग्लॅमर प्राप्त झाले आहे. हॉटेलविश्व आणि खाद्यपदार्थांची आवड असलेल्यांसाठी ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा अभ्यासक्रम उत्तम पर्याय आहे.केवळ स्वयंपाकघरात काम करणे म्हणजे ‘हॉटेल मॅनेजमेंट’ या क्षेत्राविषयी असलेली चुकीची व्याख्या आता बदलली आहे. ग्लॅमर विश्वात वावरू पाहणाऱ्यांसाठी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम एक पर्वणी आहे. पंचतारांकित हॉटेलांमध्ये विविध पदावर हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. या अभ्यासक्रमात स्वयंपाकघरापासून ते हॉटेलची स्वच्छता, सजावट, ग्राहकांशी वागणूक याविषयी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करणे अनिवार्य असते. यातूनच विद्यार्थ्यांना कोठे वळायचे हे कळते.बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट विषयात बीए इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल अ‍ॅण्ड कॅटरिंग मॅनेजमेंट, बीए इन हॉस्पिटॅलिटी सायन्स करू शकतात. हे अभ्यासक्रम ६ महिन्यांपासून ते ३ वर्षांपर्यंत असतात. यातून पदवी मिळविल्यानंतर अनेक अ‍ॅडव्हान्स कोर्सदेखील तुम्ही करू शकता; शिवाय या अभ्यासक्रमांसोबतच फूड प्रोडक्शन मॅनेजमेंट, डाएटिंग अ‍ॅण्ड न्युट्रीशन, हाउस किपिंग, फ्रंट आॅफिस आणि टुरिझम मॅनेजमेंट इ. विषयांत स्पेशलाईज स्टडी करू शकता.>पात्रता : कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटसाठी प्रवेश घेऊ शकतात. यासाठी २२ वर्षांची वयोमर्यादा आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा (लेखी) आणि मुलाखत घेतली जाते. लेखी परीक्षा २०० गुणांची असून, यात भाषा, सामान्य ज्ञान, गणितावर आधारित प्रश्न विचारले जातात. अनेक महाविद्यालयांत लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप डिस्कशनसाठी बोलावले जाते. या परीक्षेच्या गुणांवरून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जातो.>करिअरच्या संधीअनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पंचतारांकित हॉटेल्समध्ये, एअरलाइन्स फूड सर्विस विभागात, कॉर्पोरेट कँटीन, मॉल्स, मल्टीप्लेक्स, रेल्वेतील अन्न विभागात नोकरी मिळू शकते. >हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाअंजुमन-इस्लाम इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, सीएसटीअथर्व कॉलेज आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, मालाडभारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, पुणेआयटीएम इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड कॅटरिंग टेक्नॉलॉजी, खारघर, नवी मुंबई