शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महिला कार रॅली ५ मार्चला रंगणार

By admin | Updated: March 2, 2017 02:38 IST

महिला सबलीकरणाचा संदेश देत आगामी महिला दिनानिमित्त ५ मार्चला मुंबईत विशेष महिला कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई : महिला सबलीकरणाचा संदेश देत आगामी महिला दिनानिमित्त ५ मार्चला मुंबईत विशेष महिला कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सलग तिसऱ्या वर्षी रंगणाऱ्या या रॅलीमध्ये सुमारे ८०० ते १००० मुंबईकर महिला ड्रायव्हर्सचा सहभाग होणार आहे.वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनच्या (डब्ल्यूआयएए) वतीने होत असलेली ही रॅली मुंबई विमानतळाजवळील एका नामांकीत हॉटेलपासून सकाळी ७ वाजता सुरु होईल. त्यानंतर, वरळी सी फेस, पेडर रोड, चौपाटी, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट अशा मार्गाने लोणावळा अ‍ॅम्बी व्हॅली येथे समाप्त होईल. सोशल मिडियावर सध्या विविध प्रकारे महिला चालकांवर टीका होते. अनेकदा त्यांच्यावर विनोद तयार करुन महिलांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. परंतु, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, ड्रायव्हींग सारख्या पुरुषी क्षेत्रातही आम्ही आमचे वेगळे स्थान निर्माण करु शकतो, असा संदेश देत मुंबईतील महिलांनी गेल्या दोन वर्षांपासून हा उपक्रम यशस्वी केला आहे. यंदाच्या तिसऱ्या वर्षी या मोहिमेमध्ये १८ ते ७५ वयोगटातील महिला ड्रायव्हर्सचा सहभाग लाभला आहे.बेला दंताना, अल्पा धकन आणि बिना शाह या तीन महिला ड्रायव्हर्स सलग तिसऱ्यांदा या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. आम्ही पुर्ण तयारीनिशी महिलांना नवा आत्मविश्वास मिळवून देण्यास सज्ज असल्याचे, या तिन्ही ड्रायव्हर्सनी ‘लोकमत’ला सांगितले. सुमारे २५० हून अधिक कारचा सहभाग या रॅलीमध्ये असून प्रत्येक कारमध्ये चार महिलांचा समावेश असेल. यामध्ये ड्रायव्हर, नेव्हीगेटर (मार्गदर्शक) आणि दोन सहकारी प्रवाशी असा एक संघ असेल. प्रत्येक संघाला निर्धारीत वेळेत रॅली पुर्ण करणे आवश्यक असेल. तसेच, प्रत्येक संघाला गणिती सुत्रांवर आधारीत रॅलीचा मार्ग आखून देण्यात आला असून हे सुत्र सोडविण्याची जबाबदारी सहकारी प्रवाशांवर असेल. तर, मिळालेल्या मार्गाची दिशा दाखवण्याची जबाबदारी नेव्हीगेटरवर असेल. (प्रतिनिधी)