शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महिलाही स्कूल बस चालवणार!

By admin | Updated: June 28, 2016 05:42 IST

स्कूल बसमधून ने-आण करताना शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.

मुंबई : स्कूल बसमधून ने-आण करताना शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. यात खास करून मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा सातत्याने समोर येत असल्याने, स्कूल बस चालवण्यासाठी महिला चालकही नेमण्याचा परिवहन विभागाकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ‘लोकमत’ने ‘रिअ‍ॅलिटी चेक’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून वाहतूक होताना, नियमांना हरताळ फासला जात असल्याचे उघडकीस आणले. या संदर्भात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बोलताना रावते यांनी ही माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्कूल बस मुंबईत धावतात. मात्र, परिवहन विभागाने आखून दिलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम स्कूल बस चालक व मालकांकडून केले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतो. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणली. या संदर्भात परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना विचारले असता, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे आणि परिवहन विभागाकडून सुरक्षेसंदर्भातील नियम न पाळणाऱ्या स्कूल बसविरोधात कारवाई होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्कूल बसच्या नियमावलीचे पालन करण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत. शाळांकडून, तसेच स्कूल बस चालक-मालकांकडून त्याचे पालन केले जाते का? याची पाहणी शिक्षण विभागानेही केली पाहिजे. त्यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसोेबत अनेक विचित्र घटना घडल्या आहेत, त्या संतापजनक आहेत. त्यामुळे स्कूल बसमधून त्यांची ने-आण करताना सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत असल्याने, बस चालवण्यासाठी महिला चालक नेमता येणे शक्य आहे का? याचा विचार आपण गांभीर्याने करत असल्याचे रावते यांनी सांगितले. असे झाल्यास सगळेच प्रश्न सुटतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महत्त्वाची बाब म्हणजे, व्हॅन आणि रिक्षांमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक होताना नियमांची पायमल्ली होत असल्याने त्याविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)>चार अवैध वाहनांवर कारवाईसेंट मेरी, सेंट पीटर या माझगावमधील शाळांमध्ये सुुरू असलेली विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक ‘लोकमत’ने रिअ‍ॅलिटी चेकच्या माध्यमातून समोर आणली. त्यानंतर, भायखळा वाहतूक पोलिसांनी या शाळांच्या आवारात जाऊन या बसवर धडक कारवाई केली. या स्कूल बस खासगी ठेकेदारांमार्फत चालविण्यात येत होत्या. या स्कूल बसच्या चार ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्याचे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास तांबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. एसटीची भूमिका चोखग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी एसटी हीच स्कूल बस आहे आणि एसटी आपली भूमिका योग्यपणे बजावत असल्याचे प्रशस्तिपत्रक रावते यांनी दिले.