शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

महिला सर्वच क्षेत्रात अव्वल - नीता अंबानी

By admin | Updated: July 24, 2016 05:00 IST

एका अहवालानुसार केवळ २५ टक्के महिलाच नोकरी करतात, असे निदर्शनास आले. मात्र माझ्या मते देशातील सर्वच महिला विविध क्षेत्रात काम करत असून त्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत

- ‘शी वॉक, शी लीड्स’ पुस्तकाचे प्रकाशन

एका अहवालानुसार केवळ २५ टक्के महिलाच नोकरी करतात, असे निदर्शनास आले. मात्र माझ्या मते देशातील सर्वच महिला विविध क्षेत्रात काम करत असून त्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहेत, असे प्रतिपादन नीता अंबानी यांनी ‘शी वॉक, शी लीडस्’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी केले. उद्योजक आणि लेखिका गुंजन जैन यांच्या ‘शी वॉक, शी लीडस’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी ताजमहाल पॅलेस येथे पार पडला. या सोहळ्यात नीता अंबानी यांनी आपले हे मत व्यक्त केले. पुस्तकाविषयी त्या म्हणाल्या की, देशात विविध क्षेत्रात महिला स्थान टिकवून आहेत. हे पुस्तक त्याचीच साक्ष आहे. महिला आणि पुरुष असा भेद करणाऱ्यांसाठी ती एक चपराक आहे. येत्या काही वर्षांमध्ये महिला अधिक सक्षम होतील, यात काही शंकाच नाही. या सोहळ्यात सिनेसृष्टीसह उद्योग जगतातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरला. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी त्याला पाठिंबा देणाऱ्या अनेक महिलांचे शाहरुखने यावेळी आभार मानले. पुस्तकाविषयी बोलताना उद्योजक अजय पिरामल यांनी सिंधुताई सपकाळ यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यातील चढउतार पाहिला की, महिला किती सक्षम असू शकते याचा अंदाज येतो. एकदा तरी सगळ्यांनीच सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी वाचावे. त्याचा फायदा महिला आणि पुरुष दोघांनाही होईल.लेखिका गुंजन जैन यांनी पुस्तकाच्या घडणीमागचे अनुभव कथन केले. या पुस्तकात विविध क्षेत्रातील २४ महिलांच्या उल्लेखनीय कामगिरीचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने राजश्री बिर्ला, नीता अंबानी, सुधा मूर्ती, चंदा कोचर, प्रियंका चोप्रा, करिना कपूर, अमानिका खन्ना, ज्योत्स्ना दर्डा, मेरी कोेम, सानिया मिर्झा या दिग्गज महिलांच्या आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. याप्रसंगी मुकेश अंबानी, आदी गोदरेज, सुहेल सेठ, दीपक पारेख, अनंत अंबानी, ‘लोकमत’ समूहाचे विजय दर्डा, देवेंद्र्र दर्डा, ऋषी दर्डा, करण दर्डा, शायना एनसी, सीमी गरेवाल, सुझान रोशन, स्वाती पिरामल यांची विशेष उपस्थिती होती.