शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी अत्याचाराचा प्रतिकार करावा

By admin | Updated: August 3, 2016 00:51 IST

प्रत्येक घरातील महिलेने ठरविले, तर कोणत्याही घरात भ्रष्ट पैसा येणार नाही.

पुणे : प्रत्येक घरातील महिलेने ठरविले, तर कोणत्याही घरात भ्रष्ट पैसा येणार नाही. आपल्या हिमतीवर महिलांनी आपले कर्तृत्व गाजवावे. अत्याचारांविरोधात महिलांनी स्वत:च प्रतिकार केला पाहिजे. महिला बदलल्या तर देशदेखील खऱ्या अर्थाने बदलू शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ कृषितज्ज्ञ प्रा. डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केले. अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या म्हसोबा उत्सवांतर्गत भरत नाट्य मंदिर येथे भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. मधुबाला चोरडिया, उद्योजक गणेश भिंताडे, नगरसेविका रूपाली पाटील-ठोंबरे, अनिल दिवाणजी, डॉ. सतीश देसाई, कलाकार विकास पाटील, सायली देवधर, राहुल सूर्यवंशी, भोला वांजळे, गोविंद वांजळे, प्रियेश सरोदे, दिनेश पिसाळ, तुषार रायकर, सुधीर साकोरे, योगेश निकम आदी उपस्थित होते. ज्येष्ठ संगीतकार पं. हदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, रांका ज्वेलर्स कर्वे रोडचे संचालक ओमप्रकाश रांका, प्रवीण मसालेवालेचे संचालक विशाल चोरडिया, खारवडे म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके-मारणे आणि सुनील जगताप यांना भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्काराला उत्तर देताना पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी, मंडईमध्ये ज्या भागात आमचे वडील पं. दीनानाथ मंगेशकर व कुटुंबीय राहत होतो आणि ज्या ठिकाणी वडिलांनी अखेरचा श्वास घेतला, त्या भागातील संस्थेकडून पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत हृद्य गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नव्हे, तर माझ्या वडिलांचा आणि माझ्या मंगेशकर कुटुंबीयांचा आहे, असे सांगितले. मधुरा भेलके मारणे म्हणाल्या, ‘‘धार्मिक संस्थांना धार्मिकतेकडून विधायकतेकडे नेण्याच्या दृष्टीने खारवडे म्हसोबा देवस्थानचे कार्य सुरू आहे. लोकांच्या भावना न दुखावता त्यांच्या अंधश्रद्धा दूर करण्याचे काम आम्ही केले. देवस्थानला मिळणाऱ्या देणग्या पुन्हा समाजाकडे वळवून समाजहिताचे कार्य आम्ही करीत आहोत.’’हर्षदा खानविलकर यांनीही मनोगत व्यक्त केले. निवृत्ती जाधव यांनी प्रास्ताविक केले. अभिनेत्री अश्विनी जोग यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)