शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी सक्षम व्हायला हवे : अमृता फडणवीस

By admin | Updated: February 8, 2016 02:18 IST

आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे

पुणे : आपल्याकडे महिलांना कायम पुरुषांची सावली म्हणून पाहिले जाते. परंतु ही प्रतिमा बदलण्यासाठी महिलांनी स्वत:ला आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करायला हवे. त्यामुळे देशाचा विकास होण्यास निश्चितच मदत होईल, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू व आॅल इंडिया अ‍ॅँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम.एस. बिट्टा उपस्थित होते. या वेळी आचार्य ब्रह्मऋषी गुरुवानंद स्वामी यांना ‘सूर्यरत्न -आधुनिक युगाचे संत’ हा पुरस्कार देण्यात आला. तर पद्मभूषण डॉ. सत्यव्रत शास्त्री, न्यायमूर्ती पी. बी . सावंत, प्यारेलाल शर्मा, पद्मभूषण राजन व साजन मिश्रा, दिलीप छाब्रिया, डॉली ठाकूर, मोतिलाल ओसवाल, उदित नारायण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पवनकुमार रुईया, अंजली गोपालन, राजेंद्र मेहता, लीना मोगरे, दिनेश नाथानी, मानवेन्द्रसिंग गोहिल, डॉ. रणजित जगताप, विवेक वेलणकर, प्रदीप लोखंडे, सुधीर गोयल, सायली आगवणे, निलाद्री कुमार व अमृता फडणवीस यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. फडणवीस म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांची पत्नी ही माझी ओळख असली तरी त्यापलीकडे जायला मला आवडते. देशसेवेची सुरुवात ही कुटुंब आणि समाजसेवेपासून व्हायला हवी. मुख्यमंत्रीही सामाजिक कामाला कायम प्रोत्साहन देतात. मी पुरस्कार कधीही परत करणार नाही, कारण पुरस्कार परत करणे हा तो देणाऱ्याचा अपमान करण्यासारखे असते. पुरस्कार हा प्रसादासारखा असल्याने तो कधीही परत केला जात नाही. श्याम जाजू म्हणाले, समाजाचे परिवर्तन करणे ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. समाज, त्यातील लोक, परिस्थिती सारखीच आहे मात्र पंतप्रधान ती ज्या पद्धतीने मांडत आहेत ती विशेष आहे. येत्या ५ वर्षांत इन्स्टिट्यूटचे रूपांतर विद्यापीठात करणार असल्याचे डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले. या वेळी फडणवीस यांनी ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’ हे भजनही सादर केले. सूत्रसंचालन जयकिशन शर्मा यांनी केले.