शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदीसाठी महिला रस्त्यावर

By admin | Updated: July 19, 2016 00:51 IST

भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी सोमवारी बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई चौकात मानवी साखळी करून दारूबंदीसाठी आंदोलन केले.

पुणे : दारूबंदी झालीच पाहिजे.... आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणा देत भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी सोमवारी बालगंधर्व रंगमंदिराजवळील राणी लक्ष्मीबाई चौकात मानवी साखळी करून दारूबंदीसाठी आंदोलन केले. कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईचीही मागणी करण्यात आली.संघटनेच्या पुण्याच्या अध्यक्षा दुर्गा शुक्रे म्हणाल्या, ‘‘दारूमुळे आज अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांचे नवरे आज दारू पिऊन गेल्याने एकटीने संसाराचा गाडा ओढण्याची वेळ महिलांवर येते. हे प्रकार बंद व्हावेत यासाठी गावागावांतून याविषयी जनजागृती मोहीम राबविण्याचे संघटनेने ठरवले आहे.’’संघटनेच्या संघटक कमल सावंत, प्रियंका जगताप, पुष्पक केवडकर व अनेक महिला उपस्थित होत्या. भूमाता ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष बुधाजीराव मुळीक यांच्या मार्गदर्शनाने हे आंदोलन करण्यात आले.मुळीक म्हणाले, ‘‘ग्रामीण भागामधे दुष्काळानंतरच सर्वांत मोठा प्रश्न दारूचा आहे. इतर राज्यात दारूबंदी होऊ शकते तर महाराष्ट्रात का नाही?’’राज्य सरकारला यामधून महसूल मिळतो म्हणून दारूवर बंदी येणार नसेल तर त्यविरोधात लढा द्यावाच लागेल. दारूबंदी झाल्यास सामाजिक सुरक्षा नक्कीच वाढेल. यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा. त्या एकत्रित लढल्या तर मुलगा आणि नवरा दारू पिऊन घरी येणार नाहीत. कर्जतमधील मुलीवर अत्याचार करणारे नितीन भैलुमे, संतोष भवाळ आणि पप्पू शिंदे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने केली. (प्रतिनिधी)कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या प्रकरणाचे मूळही दारूतच आहे. दारू प्यायलेले पुरुष महिलांवर बलात्कार, अत्याचार करतात. यामध्ये महिलेचा विनाकरण बळी जातो. १५ आॅगस्टच्या आत दारूबंदी झाली पाहिजे; अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करणार आहोत. - प्रियंका जगताप