शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

महिलांमध्ये ‘रक्ताल्पता’ होतेय गंभीर समस्या..

By admin | Updated: March 5, 2016 00:39 IST

बदलती जीवनशैली व रोजची धावपळ, यामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. आरोग्यविषयक हेळसांड, शरीर स्वास्थ्याबाबत अनास्था व जाणीवपूर्वक दुर्लक्ष यांमुळे महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण वाढत आहे.

पिंपरी : बदलती जीवनशैली व रोजची धावपळ, यामध्ये महिलांच्या आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. आरोग्यविषयक हेळसांड, शरीर स्वास्थ्याबाबत अनास्था व जाणीवपूर्वक दुर्लक्ष यांमुळे महिलांमधील रक्ताक्षयाचे प्रमाण वाढत आहे.रक्तामध्ये १२ ते १४ मिलि इतके हिमोग्लोबीनचे प्रमाण आवश्यक असते. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यावर रक्ताक्षय हा विकार होतो. बऱ्याच महिलांमध्ये हे प्रमाण कमी असल्याने त्या रक्ताक्षयाला बळी पडतात. अलीकडच्या काळात महिलांमधील रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण सातत्याने कमी होत असलेले आढळून येत आहे. याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, त्यावर योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. शासनाने महिला आरोग्यासाठी ज्या सुविधा, योजना राबवलेल्या आहेत, त्यांची माहिती सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. समाजात जनजागृती, आरोग्याचा संदेश याची गरज आहे. मागील वर्षाच्या तुलनेत रक्ताक्षय असणाऱ्या महिलांची संख्या ३७ने वाढली आहे. १४ वर्षांवरील शाळकरी मुली व महाविद्यालयीन युवतींची संख्या वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रक्ताक्षय होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. (प्रतिनिधी)महिलांमधील हिमोग्लोबीनची कमतरता हा गंभीर विषय आहे. महापालिक ा वेळोवेळी याबाबत उपाययोजना करते. जनजागृती शिबिर, मार्गदर्शन शिबिर, याबरोबरच फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या पुरवल्या जातात. -डॉ.पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी> शरीरातीलहिमोग्लोबीन वाढविण्यासाठीपालक : रक्ताक्षयात रक्तातील लोह (आयर्न) वाढण्यासाठी पालक आहारात असणे महत्त्वाचे आहे. सूप, भाजी, वडे, आमटी, तसेच सलाद या स्वरूपात पालक घेता येईल. लिंबू पिळून खाण्याने पालकाचा अधिक फायदा मिळवता येतो.संत्रे : संत्र्यातील क व ब ६ ही जीवनसत्त्वे रक्तातील हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे रोज कमीत कमी दोन ग्लास संत्र्याचा रस साखरेशिवाय घेणे फायद्याचे ठरते.दूध व दुग्धजन्य पदार्थ : नियमित किमान ग्लासभर दूध व दुग्धजन्य पदार्थ आहारात महत्त्वाचे ठरतात. दुधातून शरीराला पूरक मिनरल्स (खनिजे), जीवनसत्त्वे मिळतात. हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.फरस बी : प्रथिने, कॅल्शियम, लोह, गंधक, फॉस्फरस, तसेच अ जीवनसत्त्वयुक्त असल्याने फरस बी ही पोषक भाजी आहे. यातील फॉलिक अ‍ॅसिडमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे योग्य प्रमाण राखता येते.> डाळिंब : महिलांसाठी डाळिंब सौंदर्यासाठी उपयुक्त असण्याबरोबरच लोहवर्धक, तसेच क जीवनसत्त्वयुक्त असल्याने हिमोग्लोबीन वाढीसाठी आठवड्यातून तीन ते चार वेळा डाळिंबाचा रस घेणे फायद्याचे ठरते.खजूर : काळा व लाल खजूर या दोन प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. खजूर लोह, क जीवनसत्त्व वाढवतात. लाल रक्तपेशींची निर्मिती वाढते. नुसताच किंवा बर्फी, लाडू, चटणी अशा प्रकारे खजूर आहारात घेता येईल.सुका मेवा : पिस्त्यामध्ये ब ६ जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असल्यामुळे पिस्ता सर्वाधिक प्रमाणात जीवनसत्त्वे पुरवतात.