शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

महिला तक्रार निवारण समिती

By admin | Updated: September 22, 2016 02:19 IST

गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली

पुणे : गेली तीन वर्षे केवळ कागदावरच असलेली पीएमपीएमएलमधील महिला तक्रार निवारण समिती पुन्हा कार्यरत झाली आहे. पीएमपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून, मागील तीन महिन्यांत समितीने तीन तक्रारींची चौकशी सुरू आहे. त्यातील दोन प्रकरणांमध्ये चौकशीसाठी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, एका कर्मचाऱ्याला चौकशीची नोटीस बजाविण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमपीच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीमधील स्वच्छतागृहात मोबाईलद्वारे छायाचित्रण झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने ही समिती कार्यरत करण्यात आली आहे.राज्यशासनाच्या आदेशानुसार, शासकीय कार्यालयांमध्ये महिलांना होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी पीएमपी प्रशासनाने २0१३ मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात किरकोळ तक्रारी वगळता या समितीकडे फारशा तक्रारी येत नसल्याने ही समिती कागदावरच शिल्लक होती. मात्र, गेल्या वर्षभरात महिलांसंदर्भातील तक्रारी वाढल्या असल्याने तसेच तक्रार करण्यासाठी महिलाही पुढे येत असल्याने काही महिन्यांपूर्वी बीआरटीचा पदभार स्वीकारलेल्या कोल्हे यांनी या समितीची नव्याने नियुक्ती केली आहे. याबाबतचे माहितीफलकही पीएमपी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आलेले असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.तक्रारींमध्ये प्रामुख्याने पाठलाग करणे, मानसिक त्रास देणे, कामाच्या ठिकाणी अडवणूक करणे अशा प्रकारच्या तक्रारी असल्याचेही त्या म्हणाल्या. >तीन वर्षांत सहा तक्रारी पीएमपीच्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे गेल्या तीन वर्षांत सुमारे सहा तक्रारी आल्या असून, त्यातील तीन तक्रारी मागील सहा महिन्यांच्या आतील आहेत. याशिवाय काही चालक वाहकांच्या पत्नीही या समितीकडे तक्रार घेऊन येत आहेत.मात्र, या तक्रारी समितीच्या कक्षेत येत नसल्याने या तक्रारी घेण्यात आलेल्या नसल्या तरी त्यांनी तक्रार कोठे करावी, याबाबत या महिलांना समितीकडून मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे कोल्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.याशिवाय गैरसमजातून अथवा किरकोळ स्वरूपात या तक्रारी असल्यास त्या समितीपुढे येण्याआधी दोन्ही पक्षांना तडजोडीची संधी मिळावी यासाठी तडजोड समितीही स्थापन करण्यात आल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.