शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना समन्वयातून प्रवेश मिळावा

By admin | Updated: February 3, 2016 03:36 IST

स्त्री-पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे महिलांंना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश द्यायला हरकत नाही; परंतु हा प्रश्न मतभेदांतून नव्हे, तर समन्वयातून मिटायला हवा

सुधीर लंके,  अहमदनगरस्त्री-पुरुष ही एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यामुळे महिलांंना शनीच्या चौथऱ्यावर प्रवेश द्यायला हरकत नाही; परंतु हा प्रश्न मतभेदांतून नव्हे, तर समन्वयातून मिटायला हवा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळण्यासाठी भूमाता ब्रिगेडने केलेल्या आंदोलनामुळे हा वाद तापला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हजारे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘देवस्थान ट्रस्ट तसेच गावकऱ्यांनी या प्रश्नावर एकत्र येऊन तोडगा काढण्याची गरज आहे. एकत्र बसून हा वाद मिटविता येईल. देशासमोर त्यांनी या वादाचे प्रदर्शन घडवायला नको. महिला आता सर्व क्षेत्रात प्रगती करीत आहेत. स्त्री-पुरुष समता आहे. त्यामुळे सर्वांनी ठरविले तर महिलांना प्रवेश मिळण्यात अडचण काय आहे? परंतु देवस्थानची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गावालाही विश्वासात घेऊन बौद्धिक प्रबोधन करूनच हा निर्णय घ्यायला हवा. आपण या विषयावर मध्यस्थी करणार का? असा प्रश्न केला असता, आध्यात्मिक क्षेत्रात माझ्याहूनही अधिकारी दर्जाच्या व्यक्ती आहेत. त्यांनी मध्यस्थी करत तोडगा काढण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे हजारे म्हणाले. धर्मदाय आयुक्तांना अंनिसचा सवालचौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश नाकारण्याच्या कृतीचे आपण समर्थन करीत आहात काय, असा थेट सवालच अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धर्मदाय आयुक्तांना निवेदनाद्वारे केला आहे़ त्यामुळे स्त्री प्रवेश बंदीचा वाद आता कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत़ चौथऱ्यावर सध्या स्त्री व पुरुषांना बंदी आहे, असे विधान खोटे आहे़ देवस्थानला ११ हजार रुपये देणाऱ्या पुरुषाला चौथऱ्यावर प्रवेश दिला जातो़ याचाच अर्थ ही संपूर्ण शोषणव्यवस्था आहे़ यासंदर्भात विश्वस्तांना जाब विचारला का, असा सवाल अंनिसने केला केला आहे़पतित पावनसंघटनेचा पाठिंबाशनी चौथऱ्यावर महिलांना प्रवेश देण्याच्या मागणीला पतित पावन संघटनेचे शहराध्यक्ष सचिन धोत्रे यांनी पाठिंबा दिला आहे.