शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महिला सक्षमीकरण म्हणजे विवाहबाह्य संबंध नव्हे - सोनाक्षी

By admin | Updated: April 2, 2015 12:01 IST

अभिनेत्री दीपिका पडूकोणचा 'माय चॉईस' हा व्हिडीओ खूप चर्चेत असला सोनाक्षी सिन्हाला तो फारसा पटला नसून महिला सक्षमीकरण म्हणजे विवाहबाह्य संबंध नव्हे असे तिने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ -  गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री दीपिका पडूकोणचा 'माय चॉईस' हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये महिलांबद्दलची पुरूषांची संकुचित मनोवृत्ती बदलण्यासंबंधी आवाज उठवण्यात आला असून बॉलिवूडमधील अनेक कलाकार या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, शबाना आझमींसारख्या दिग्गज कलाकारांनी दीपिकाच्या व्हिडीओचे कौतुक केले असले तरी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला मात्र तो फारसा आवडलेला दिसत नाहीये. हा व्हिडीओ महिला सक्षमीकरणावर केंद्रित असला तरी महिलांचे सक्षमीकरण म्हणजे व्यभिचार अथवा विवाहबाह्य संबंध नव्हे असे सोनाक्षीने म्हटले आहे. 
सोनाक्षीने अद्याप हा व्हिडीओ पाहिला नसला तरी त्याबाबत तिने तिचे मत मांडले आहे. 'महिलांचे सक्षमीकरण म्हणजे त्यांना रोजगार आणि ताकद देणे. शारीरिक संबंध किंवा कोणते कपडे घालावे याच्याशी त्याचा संबंध नाही' असे सोनाक्षीने म्हटले आहे. 'ज्या महिलांना खरी गरज आहे त्यांचेच सक्षमीकरण व्हायला हवे. सुखी, समृद्ध जीवन जगलेल्या महिलांना त्याची गरज नाही' असे मतही तिने नोंदवले आहे. मात्र असे असले तरी या व्हिडीओद्वारे एक चांगले पाऊल उचलण्यात आल्याचे सोनाक्षीने मान्य केले असून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत तो विचार पोहोचला पाहिजे असेही तिने म्हटले आहे.
'माय चॉईस' या व्हिडीओत दीपिकाने पुरूषांना महिलांविषयीची संकुचित मनोवृत्ती बदलण्याचे आव्हान केले आहे. 'मी माझ्या मनाला वाटेल तसे जीवन जगू शकते. मला पाहिजेत तसे कपडे घालू शकते, लग्न कधी करावे हेही मीच ठरवेन', असे या व्हिडीओत म्हटले आहे.