शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी कर्तृत्वातून आरक्षण सार्थ ठरविले

By admin | Updated: June 2, 2017 02:14 IST

सांसद ग्रामयोजनेतून विकास करताना सरकारने एक नया पैसाही तरतूद केलेली नसताना केवळ खासदार म्हणून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : सांसद ग्रामयोजनेतून विकास करताना सरकारने एक नया पैसाही तरतूद केलेली नसताना केवळ खासदार म्हणून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या जोरावर गावचा विकास करण्याचे काम वंदना चव्हाण यांनी लीलया पेलले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून महिलांना आरक्षण देताना अनेक प्रस्थापितांनी व्यक्त केलेली भीती महिलांनी त्यांच्या कर्तृत्वाने खोटी ठरविली आहे. असे प्रतिपादन माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी सुदुंबरे (ता. मावळ) येथे केले.सांसद आदर्श ग्रामयोजनेंतर्गत पुण्याच्या खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या सुदुंबरे गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रतिभाताई पवार, खासदार श्रीरंग बारणे, खासदार चव्हाण, माजी खासदार विदुरा नवले, माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार कृष्णराव भेगडे, दिगंबर भेगडे अ‍ॅड. राम कांडगे, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, सरपंच संगीता भांगे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, ज्येष्ठ नेते बाजीराव गाडे, आदी उपस्थित होते.महिला अस्मिता भवन, वडगाव लायन्स क्लब बगीचा, वैयक्तिक ८० शौचालये, प्राथमिक शाळा इमारत, रस्ते, शुद्ध पाणीपुरवठा प्रकल्प, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल गाव संकल्पना आदी विकासकामांचा संदर्भ खासदार चव्हाण यांनी दिला. ग्रामस्थातर्फे माजी सरपंच माणिक गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. तहसीलदार रणजित देसाई, गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे आदी उपस्थित होते.