शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या केंद्रस्थानी महिलाच - मुख्यमंत्री

By admin | Updated: March 9, 2017 02:01 IST

देशाच्या मानव संसाधनात ५० टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करुन घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने

मुंबई : देशाच्या मानव संसाधनात ५० टक्के महिलांना प्रशिक्षण देऊन सहभागी करुन घेतले आणि त्या अर्थव्यवस्थेचा भाग झाल्या तर देशाची प्रगती झपाट्याने होते. हे लक्षात घेऊन राज्य शासनाने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन योजना राबवण्यास प्राध्यान देत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या वतीने आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होते. मानवी व्यापार रोखण्यासाठीच्या कृती आराखडा आणि यशोगाथा पुस्तिकेचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले. मुंबईत नोकरीसाठी येणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रेंट अ होम’ या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. महिला बाल विकास विभागाने सुरू केलेला ‘इलेक्ट्रॉनिक फिजिओ ग्रोथ मॉनिटिरिंग सिस्टिम’च्या माध्यमातून बालकांच्या आरोग्याचे आॅनलाईन ट्रॅकिंग सिस्टीममुळे कुपोषणावर मात करण्यासाठी उपाययोजना करता येतील. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ सारखी योजना असेल किंवा महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आखलेल्या योजनांमुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहेत. महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाला आळा घालण्यासाठी विभागाने तयार केलेल्या लसीकरण उपक्रमास राज्य शासन व आरोग्य विभाग मदत करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज समाजातील सर्वच स्तरात महिलांना नाकारण्याचे स्त्रीभ्रूण हत्या करण्याचे घडत असलेले प्रकार निंदनीय आहेत. अशा घटनांविरुद्ध राज्य शासन कठोर पावले उचलत आहे. (प्रतिनिधी)