शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महिलाच जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ

By admin | Updated: December 22, 2016 01:40 IST

जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ महिलाच आहेत. स्त्री कुटुंबाचा कणा असते. स्त्री एक चांगली आई असते. कारण कुठल्याही

बारामती : जगातील सर्वोत्कृष्ट अर्थतज्ज्ञ महिलाच आहेत. स्त्री कुटुंबाचा कणा असते. स्त्री एक चांगली आई असते. कारण कुठल्याही आईला जर विचारले, की तुला आयुष्यात काय करायचे आहे. तेव्हा ती म्हणते, मला माझ्या मुलांना शिकवायचे आहे. ती त्यासाठी काटकसर करते, प्रसंगी तडजोड करते. एक स्त्री शिकली, की कुटुंबाची प्रगती होते. ‘स्वयंसिद्ध व्हा’ हा संदेशच या युवती संमेलनातून मिळतो आहे, असे मत रुरल रिलेशनचे संस्थापक प्रदीप लोखंडे यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित शारदाबाई पवार महिला महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित स्वयंसिद्धा युवती संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी संस्थेच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी युवतींना मार्गदर्शन केले. प्राचार्य राजकुमार देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात स्वयंसिद्धा युवती संमेलनात चार दिवसांच्या चाललेल्या संमेलनाचा आढावा घेतला. युवतींना संमेलनाला पाठविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील, प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम व सर्व महाविद्यालयांच्या प्रचार्य, प्राध्यापक व पालकांचे आभार मानले. प्रा. आर. एस. लोहकरे यांनी स्वयंसिद्धा युवती संमेलनाच्या कार्यक्रमाचे अहवालवाचन केले. स्वयंसिद्धा युवती संमेलनातील सर्वोतकृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्रीरामपूर येथील बोरावके महाविद्यालायाची गीता काकासाहेब मुळे, सासवडच्या वाघिरे महाविद्यालयाची भावना मंगेश बोरकर, शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालायाची पूजा विलास पंदरकर यांची निवड करण्यात आली. त्यांना सुनंदा पवार, प्रदीप लोखंडे, प्राचार्य डॉ. आर. जी. पवार यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे समन्वयक प्रल्हाद जाधव यांनी दीपोत्सवाचे संचालन केले व स्त्री-भ्रूणहत्या न करण्याचा संकल्प करण्यास सांगितले. प्रत्येकाने अंतरीचा दिवाही प्रज्वलित ठेवावा, असे आवाहन केले. या वेळी स्वयंसिद्धा संमेलनातील युवती व सर्व उपस्थितांनी पणती प्रज्वलित केली. ‘ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो’ या गीताने सभागृहातील वातावरण भारावून गेले. त्यानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.