शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

नागपुरात महिला वकिलाची हत्या

By admin | Updated: April 15, 2017 01:39 IST

गिट्टीखदानमधील महिला वकिलाची अल्पवयीन आरोपीने चाकूने भोसकून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राजश्री ऊर्फ राजेशकुमारी विश्वस्वरूप टंडन (५२) असे

नागपूर : गिट्टीखदानमधील महिला वकिलाची अल्पवयीन आरोपीने चाकूने भोसकून हत्या केली. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. राजश्री ऊर्फ राजेशकुमारी विश्वस्वरूप टंडन (५२) असे या वकिलाचे नाव आहे. त्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ मानवसेवानगरात राहत होत्या. शेजारीच राहणाऱ्या आरोपीच्या परिवारासोबत त्यांचा अनेक वर्षांपासून वाद होता. आरोपीच्या आजोबांविरुद्ध कायदेशीर कारवाई करतानाच राजश्री यांनी आपल्या प्रभावाचा गैरवापर करीत आरोपीच्या वडिलांवरही दोन वर्षांपूर्वी हद्दपारीची कारवाई करून घेतली.येत्या जूनमध्ये हद्दपारीचा अवधी संपणार असल्याने त्या आरोपीच्या परिवारातील इतरांना त्रास देत होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री त्या आरोपीच्या घराजवळून जात होत्या. त्याचवेळी आरोपी समोरून येत असल्याचे पाहून राजश्री यांनी त्याला टोमणा मारला. त्यावरून वाद वाढल्यानंतर राजश्रीने आरोपीच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने राजश्रीचा पाठलाग करून सपासप चाकूचे वार केले. त्या ठार झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेला. (प्रतिनिधी)आरोपी दहावीचा विद्यार्थी पोलिसांच्या माहितीनुसार, वकील असूनही राजश्री यांचे वर्तन वादग्रस्त होते. त्यांच्यावर सात गुन्हे दाखल होते. आरोपीचे वय अवघे १५ वर्षे असून, त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. राजश्री यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळेच आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.