शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

देहविक्रीसाठी दुबईत नेलेल्या महिलेची सुटका

By admin | Updated: November 25, 2015 03:07 IST

नोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील विवाहितेला देहविक्रीसाठी दुबईत नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चार दिवस दुबई एअरपोर्टवरील एका शौचालयात डांबून ठेवलेल्या या विवाहितेची अखेर सुटका झाली आहे

मनीषा म्हात्रे,  मुंबईनोकरीचे आमिष दाखवून मुंबईतील विवाहितेला देहविक्रीसाठी दुबईत नेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. चार दिवस दुबई एअरपोर्टवरील एका शौचालयात डांबून ठेवलेल्या या विवाहितेची अखेर सुटका झाली आहे. अशा प्रकारे महिलांना सापळ््यात अडकविणाऱ्या या टोळीतील पसार असलेल्या मास्टरमाइंडने अशाप्रकारे ५०० पेक्षा अधिक महिलांची सौदीमध्ये विक्री केली असून, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.कुलाबा परिसरात वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय रशीदाचा (नाव बदललेले आहे) पती अंथरुणाला खिळला आहे. त्याच परिसरातील एका उद्यानात ती सुरक्षारक्षक म्हणून काम करत होती. काही दिवसांपूर्वी तिची देहविक्रीसाठी मुलींचा सौदा करणाऱ्या टोळीतील गुलाबजान उर्फ मुन्नीसोबत गाठ पडली. रशीदा देखणी असल्याने या महिलेने रशीदासोबत ओळख वाढवून तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. रशीदाच्या घरच्या परिस्थितीबाबत माहिती घेऊन मुन्नीने तिला दुबईमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून कुटुंबाच्या सुखासाठी तिने दुबईला जाण्यास होकार दिला.त्यानुसार, दुबई एअरपोर्टवर आफताब आलम खान आणि अब्दुल रफिकसोबत ओळख करून रशीदाचा सौदा करण्यात आला. याची माहिती मिळताच रशीदाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यानंतर या दोघांच्या ताब्यात रशीदाला सोपवून मुन्नी निघून गेली. दुबई येथून रशीदाला देहविक्रीसाठी सौदीत न्यायचे होते. तिचा व्हिसा तयार होण्यास अडचणी आल्याने तब्बल चार दिवस एअरपोर्टवरील शौचालयात तिला डांबून ठेवण्यात आले होते. पळण्याचा प्रयत्न केल्यास मुलीवर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. शौचालयातील पाणी पिऊन ती जगली. तिची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी तिला बाहेर आणले. या संधीचा फायदा घेत, रशीदाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी जमावाने आरोपींना मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुबई पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, महिलांची विक्री करणाऱ्या सराईत टोळीतील आरोपी असल्याचे समोर आले. त्यानुसार या दुकलीबरोबरच त्यांनी मुन्नीलाही अटक केली. त्यानंतर रशीदाला सुखरूप मुंबईत आणण्यात आले. कुटुंबीयांकडे परतल्यानंतर रशीदाने रविवारी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कुलाबा पोलिसांनी या त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.