शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कार अडवल्याने महिलेने लगावली वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात

By admin | Updated: January 7, 2017 02:47 IST

कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री महापे येथे घडला.

नवी मुंबई : कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला महिलेकडून मारहाण झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री महापे येथे घडला. रस्त्याच्या कामामुळे वाहनांना प्रवेशबंदी असतानाही त्या ठिकाणावरून जाणारी कार अडवल्याने त्यामधील महिलेने वाहतूक पोलिसाच्या श्रीमुखात लगावली होती. त्यानंतर सोबतच्या पुरुषानेही पोलिसाला धक्काबुक्की करत, त्याच्या कामकाजात अडथळा निर्माण केला होता.ठाणे-बेलापूर मार्गावर ‘लोकमत’ प्रेस लगतच्या महापे मार्गावर हा प्रकार घडला. सदर मार्गावर काम सुरू असल्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गाकडून एमबीपीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यानुसार त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस प्रीतेश भातुसे हे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. या वेळी एक कार (एमएच ०५ सीएच २९५३) प्रवेशबंदीच्या ठिकाणाहून जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी कार थांबवून सदर मार्गावर प्रवेशबंदी असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतरही कारचालक कार पुढे नेऊ लागल्यामुळे भातुसे यांनी त्यांची कार बंद केली. याचा राग आल्यामुळे कारमधील महिलेने खाली उतरून भातुसे यांच्या श्रीमुखात लगावली. या वेळी भातुसे यांनी त्या सरकारी कामात अडथळा आणत असल्याचा समजही दिला. तर हा प्रकार पाहून काही अंतरावरील इतर वाहतूक पोलीसही त्या ठिकाणी आले. त्यांनीही सदर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, कारचालक पुरुषानेही खाली उतरून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच तुर्भे गावातील मुलांच्या नावाची धमकीही त्यांना दिली. त्यानुसार घडलेल्या प्रकाराची तक्रार भातुसे यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे केली असून, सोपान आव्हाड (२६) व सपना पाटील (२९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. दरम्यान, घडलेल्या या प्रकाराचा संताप वाहतूक पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)