शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकलमधून पडून एका विद्यार्थिनीचा मृत्यू, २ जखमी

By admin | Updated: December 1, 2015 19:51 IST

रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह लोकलमधून पडून अन्य एक विद्यार्थिनी व एक युवक गंभीर जखमी झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. १ - रेल्वे खात्याच्या भोंगळ कारभारामुळे एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला तर तिला वाचविण्याच्या प्रयत्नात तिच्यासह लोकलमधून पडून अन्य एक विद्यार्थिनी व एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पुणे-लोणावळा लोहमार्गावर देहूरोडच्या बापदेवनगर येथे आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. 

निकीता संजय आगरवाल (वय १८, रा. देहूरोड) असे या अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तर यात तिची मैत्रिण हर्षदा शंकर तलारी (वय १९, रा. देहूरोड) आणि निकीताच्या बचावासाठी आलेला धनराज तोडकर (वय २६) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर देहूरोड येथील आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हर्षदा व निकीता या पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून १२ वाजून २० मिनिटांनी सुटणाऱ्या पुणे-लोणावळा  लोकलमध्ये पिंपरी रेल्वे स्थानक येथून निकीता व हर्षदा गाडीमध्ये चढल्या. निकीता व हर्षदा पाय सोडून गप्पा मारत बसल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून पुणे-लोणावळा लोहमार्गावर दुरुस्तीचे काम सुरु आहे. काम झाल्यानंतरही कामासाठी वापरण्यात येणारे लोखंडी अँगल रेल्वे ट्रॅकलगत मातीत उभे रोवून ठेवण्यात आले होते. 
 
बापदेवनगर येथून लोकल जात असताना निकिताची चप्पल या लोखंडी अंगलमध्ये अडकली. ती काढण्याचा प्रयत्न करत असतानाच हर्षदाने तिला पकडून ठेवले. मात्र, निकीता लोकलमधून बाहेर फेकली गेले. तिच्याबरोबर हर्षदाही फेकली जात असतानाच धनराज याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही बाहेर फेकला गेला. यामध्ये निकीता जागीच ठार झाली तर हर्षदा व धनराज जखमी झाले आहेत. बापदेवनगरमधील रहिवाश्यांनी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले.