शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या जिल्ह्यात अवकाळीचा फेरा : वीज पडून महिला ठार; दोन जखमी

By admin | Updated: May 8, 2017 02:27 IST

रविवारी अर्ध्या जिल्ह्यात हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील इमानगाव येथे वीज पडून एक महिला ठार

विजांच्या कडकडाटासह वादळी गारांच्या पावसाने रविवारी अर्ध्या जिल्ह्यात हजेरी लावली. शिरूर तालुक्यातील इमानगाव येथे वीज पडून एक महिला ठार झाली. तर शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे वीज पडून दोघे जखमी झाले. तसेच बारामती, जुन्नर, खेड, पुरंदरच्याही काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. याचा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर/न्हावेर, शिरसगाव काटा : तालुक्यात अनेक गावांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला. इनामगाव येथे वीज पडून एका ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर उरळगाव येथे दोघे जखमी झाले. शिरूर शहर परिसर तसेच करडे भागात गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे पिकांच्या नुकसानीची शक्यता आहे. शिरसगाव फाटा येथे एका शेतकऱ्याचा नव्याने बांधलेला गोठा पडला.प्रचंड उष्णता व उष्णतेच्या दाहकतेमुळे सर्वत्रच लोक हैराण होते. आज दुपारी तीनच्यादरम्यान आकाश काळ्या ढगांनी दाटले. ४ च्यादरम्यान जोराचा वादळी वारा सुरू होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने शहरासह तालुक्यातील अनेक भागांत हजेरी लावली. अलका बबन थोरात (वय ४२, रा. इनामगाव) यांच्या अंगावर साडेचारच्यादरम्यान वीज कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत पाच ते सहा महिलाही शेतात काम करीत होत्या. सुदैवाने त्या बचावल्या. त्यांनी आरडाओरड केली. मात्र थोरात यांचा मृत्यू झाला होता. उरळगाव फाट्यावर (न्हावरे-तळेगाव रस्ता) वादळी वारे सुटल्याने दत्तात्रय भुजबळ, अजित शेलार झाडाखाली उभे होते. त्यांच्या अंगावर वीज कोसळली. मात्र त्यातून ते दोघेही सुदैवाने बचावले. या दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. यात शेलार यांना आज घरी सोडण्यात आले. भुजबळ यांना उद्या घरी सोडले जाणार आहे.शरसगाव फाटा येथे धनंजय कोळपे यांनी नुकताच नवीन बांधलेला गोठा वादळी वाऱ्यामुळे कोसळला. शिरूर शहर परिसरातही जवळपास अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. करडे येथे एक तास वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. शिक्रापूर येथे आजचा बाजारचा दिवस होता. बाजाराच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उन्हापासून संरक्षणासाठी ताडपत्र्याचे छत बांधले होते. हे छत उडून गेले. शेतकऱ्यांची यामुळे खूप धावपळ झाली. पाबळ, केंदूर तसेच कान्हूरमेसाई भागात यादरम्यान तुरळक पाऊस झाला. कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली.जिरायती भागात हजेरी; बागायती भाग कोरडाचलोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शहरात रविवारी (दि. ७) वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. वाढत्या उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला. सायंकाळी पावसाने गारवा निर्माण झाला होता. या पावसाने जिरायती भागात तुरळक हजेरी लावली. बागायती भाग मात्र कोरडाच होता. बारामती एमआयडीसीमध्ये गारांचे प्रमाण अधिक होते. सायंकाळी ५ वाजता अचानक वादळी वारे वाहू लागले. सुमारे १५ मिनिटे वादळी वाऱ्याने थैमान घातले. त्यानंतर वादळाची तीव्रता कमी झाली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. आज झालेल्या पावसाने डाळिंब उत्पादकांची झोप उडाली आहे.कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सय्यद अली यांनी सांगितले, की हा पाऊस डाळिंबपिकासाठी नुकसानकारक आहे. शिवाय शेतकऱ्यांनी उन्हात वाळविण्यासाठी ठेवलेले धान्य संरक्षित ठेवावे. जनावरांचेदेखील वादळी वारे, पाऊस यापासून संरक्षण होईल, याची दक्षता घ्यावी.बाबुर्डीसह लव्हेवस्ती, शेरेवाडी येथे पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. सुप्यात सायंकाळी ढग अचानक दाटून येऊन वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम भागातील मोरगाव परिसरात तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी पाचच्यादरम्यान मोरगाव, तरडोली, मुर्टी, लोणी भापकर, मासाळवाडी परिसरात वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडला. सुरुवातीला पावसाचे मोठे टिपके सुरू झाले. मात्र, अल्पावधीतच जोर कमी झाला. खेडमध्ये वळवाचा पाऊसकाळुस : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील काळुस, भोसे, रास, वडगाव, शेलगाव परिसरात वळवाच्या पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी पडल्या. चाकण-शिक्रापूर रस्त्याकडेस पाण्याची डबकी साचलेली दिसत होती.सासवड परिसरात पावसाचा शिडकावा सासवड : सासवड व परिसरात सायंकाळी ६ नंतर जोरदार वादळी वारे वाहिले. पावसाने मात्र गुंगारा दिला. पावसाचा फक्त शिडकावा झाला. दोन दिवस हवेत जास्त उष्णता होती. वादळी वारे व विजांच्या कडकडाटाने जोरदार पाऊस येईल, अशी अपेक्षा होती, मात्र पाऊस झाला नाही. पुरंदरमधील वीर -परिंचे भागात मात्र जोरदार पाऊस झाला.दौंडला पावसाच्या हलक्या सरीदौंड : शहरासह ग्रामीण भागातील काही गावांत सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी पडल्या. दौंड शहरात अधूनमधून विजांचा कडकडाट आणि वादळी वारे सुटले होते, तर नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता. पाटस, राहू, केडगाव या भागात पावसाच्या सरी झाल्या. जुन्नरच्या पूर्व भागात वादळी पाऊसराजुरी : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाला रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याने, तसेच पावसाने चांगले झोडपले. राजुरी, बेल्हा, आळेफाटा, आळे, वडगाव आनंद या गावांना सायंकाळी सहानंतर वादळी वारे तसेच पावसाने चांगले झोडपले. दरम्यान, आज दिवसभर या परिसरात चांगली उष्णता होती. दिवसभर कडक पडलेल्या उन्हामुळे सायंकाळी आकाशात ढग भरून आले होते. जोराचा वारा सुटला होता. चारच दिवसांपूर्वीच या परिसरात जोराचे वादळ होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नीरा परिसरातही हजेरी नीरा : नीरा व परिसरातील गावांमध्ये जोराचा वारा व वादळी पावसाने हजेरी लावली. वळवाच्या या पावसाने परिसरात मोठा थंडावा निर्माण झाला आहे. नीरासह राख, कर्नलवाडी, गुळूंचे, पिंपरे खुर्द आदी परिसरातील गावांमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता विजांच्या कडकडाटात जोराच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या थोड्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. आज झालेल्या वादळी वाऱ्याने जनावरांच्या गोठ्यावरील तसेच जुन्या घरांवरील कौलारू छपरे उडाली. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता.