शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ महिला अखेर पॉस्कोअंतर्गत गजाआड

By admin | Updated: April 3, 2015 02:26 IST

दहावीतल्या विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देऊन आपल्या वासनेची शिकार बनवणाऱ्या ‘त्या’ महिलेस अखेर आरसीएफ पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली

मुंबई : दहावीतल्या विद्यार्थ्याला गुंगीचे औषध देऊन आपल्या वासनेची शिकार बनवणाऱ्या ‘त्या’ महिलेस अखेर आरसीएफ पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत अटक केली. आज तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने या महिलेला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहणाऱ्या या १६वर्षीय मुलासोबत या ४०वर्षीय महिलेने तीन महिने लैंगिक अत्याचार केले होते. याबाबत मुलाच्या कुटुंबीयांनी आरसीएफ पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. मात्र तीन दिवस उलटूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने या मुलाची व्यथा ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात मांडली. त्यानुसार आरसीएफ पोलिसांनी बुधवारी सायंकाळीच या महिलेवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी या महिलेला पोलिसांनी तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.गेले तीन महिने ही महिला या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार करत होती. त्यामुळे घाबरलेला हा मुलगा निमूटपणे तिचे हे अत्याचार सहन करत होता. मात्र दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा परीक्षेचा ताण असल्याचे सांगत तो त्यांना टाळत होता. याच दरम्यान या मुलाने आत्महत्यादेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच आम्हाला ही बाब समजल्याने त्याचा जीव वाचल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यातच या अत्याचाराचा परिणाम परीक्षांवरदेखील झाला आहे. मात्र आरसीएफ पोलिसांनी आणि आमच्या काही मित्रांनी मुलाला योग्य मदत केल्याने सध्या तो तणावातून बाहेर आला असल्याचेदेखील त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. (प्रतिनिधी)