शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा मृत्यू; एकास अटक

By admin | Updated: October 3, 2016 02:00 IST

शेतमजूर महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बावड्यातील एकाविरुद्ध इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

इंदापूर : जमीन देण्याचे आमिष दाखवून बारा वर्षे शारीरिक शोषण करून शेतमजूर महिलेच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी बावड्यातील एकाविरुद्ध इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यास अटक करण्यात आली आहे.राजेंद्र केरबा पिसे (वय ४६, रा. बावडा, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. लताबाई ज्ञानदेव गुराळकर (वय ४६, रा. वकीलवस्ती, ता. इंदापूर) असे मरण पावलेल्या शेतमजूर महिलेचे नाव आहे.तिच्या मुलीने दि. २९ रोजी रात्री या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यामध्ये आरोपीने आपल्या आईस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे म्हटले आहे. तर फिर्यादीच्या भावाने आरोपीने व साथीदाराच्या मदतीने तिचा खून केला असल्याचा आरोप तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. वडील व भावांनी गावात बेअब्रू होईल या भीतीने तक्रार दिली नव्हती. मात्र, आपण देत आहोत, असे लताबाईच्या मुलीने फिर्यादीत म्हटले आले. दोन एकर जमीन देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादीच्या भावाने २८ सप्टेंबर रोजी तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये आपल्या आईचे आरोपी पिसेबरोबर असलेले संबंध तोडावेत, तिला कामावरुन काढावे, असा पिसे याच्या आईवडील व पत्नीचा आग्रह होता. तिला जमीन देण्यासही त्यांचा विरोध होता. या बाबीवर तोडगा काढण्यासाठी दि. १ सप्टेंबर रोजी आरोपीने मयत लताबाईला रानात बोलावले. तिच्यावर शारीरिक अत्याचार करून जिवे मारून विहिरीत टाकले. विवस्त्र अवस्थेत विहिरीतील मृतदेह विद्रूप झाला होता, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. या प्रकरणाची या पूर्वी दि. १६ सप्टेंबर रोजी इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मयत दप्तरी नोंद करण्यात आली होती. योगेश घोगरे यांनी मयताची खबर दिली होती. भीमशक्ती संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज पोळ, बाळासाहेब भोळे, प्रकाश भोसले, मनोज नागटिळक, हमीद शिकलकर, सतीश दोरकर यांनी थेट आरोपीवर कारवाई करण्यात यावी, यासाठी दि. २७ सप्टेंबरपासून इंदापूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. या दणक्याने काल पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुढील कारवाई झाली. >मयत लताबाई ही गेल्या सतरा वर्षांपासून राजेंद्र पिसे याच्या बावडा येथील रानात काम करत होती. तिला दोन एकर जमीन देतो, असे सांगून बारा वर्षांपासून त्याने तिच्याशी शारीरिकसंबंध केले होते. ती त्याच्याच रानात राहात होती. त्यांच्या अवैध संबंधाबद्दल सर्वांना माहिती होती. चार वर्षांपासून जमीन देण्याच्या कारणावरून त्यांच्यात खटके उडण्यास सुरुवात झाली. २ आॅगस्ट २०१६ रोजी सायंकाळी सात वाजता आरोपीने तिला तिच्या वकीलवस्ती येथील घरासमोर तुझ्या नावावर जमीन करणार नाही, जमीन देणार नाही, असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. १ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता लताबाई घरातून निघून गेली होती. ती परतली नाही. सर्वत्र शोध घेतला, पण सापडली नाही. १६ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबाराच्या सुमारास वकीलवस्ती येथील योगेश दादासाहेब घोगरे यांच्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला.