शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नगरसेवकावर महिलेने भिरकावली चप्पल

By admin | Updated: May 3, 2017 05:48 IST

पश्चिमेकडील लालचौकी परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय विठाबाई शिंदे यांनी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्या

कल्याण : पश्चिमेकडील लालचौकी परिसरात राहणाऱ्या ६४ वर्षीय विठाबाई शिंदे यांनी शिवसेना नगरसेवक मोहन उगले यांच्या दिशेने महापालिका मुख्यालयात मंगळवारी चप्पल भिरकावली.शिंदे यांनी उगले यांची कॉलर पकडली. उगले यांनी विठाबाईंचा हात झटकला असता तिने उगले यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. महापालिका मुख्यालयात झालेल्या या घटनेमुळे सुरक्षा रक्षकांची पळापळ झाली. त्यांनी उगले व विठाबाई या दोघांनाही कसेबसे दूर केले. विठाबाई यांच्यासोबत असलेला मुलगा अशोक याला उगले यांनी ठोसा लगावला. उगले यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अशोक याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. विठाबाई या लालचौकी परिसरातील शिंदे मळा येथे राहतात. त्यांनी त्यांच्या घरासमोर शेड उभारली आहे. ही शेड बेकायदा असल्याची तक्रार नगरसेवक उगले यांनी केली होती. उगले यांच्या तक्रारीवरून प्रभाग अधिकाऱ्यांनी ही शेड तोडण्याची कारवाई केली. उगले यांना धडा शिकवण्याकरिता शिंदे यांनी त्यांनी त्यांच्या घरासमोर उभारलेली शेड बेकायदा उभारली आहे. तसेच ठाणकार पाडा येथे बेकायदा शिवसेना शाखा उभी केली असल्याची तक्रार प्रभाग अधिकाऱ्यांकडे केली. प्रभाग अधिकारी उगले यांच्या बेकायदा शेड व शिवसेना शाखेवर कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ विठाबाई यांनी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. उपोषणाचा इशारा देणारी पाटी हातात घेऊन त्यांनी प्रवेशद्वारासमोर बसण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या हातातील पाटी हिसकावून घेत मुख्यालयाच्या आवाराबाहेर उपोषण करा, असा सल्ला दिला. राष्ट्रवादीचे पदाधिकारी मदन दराडे यांनी विठाबाईंना आंदोलन करण्यापासून मज्जाव करुन नका, असे बजावत सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घातली. त्याचवेळी नगरसेवक उगले हे मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयातील काम करुन ते पुन्हा परतत असताना संतप्त विठाबाई यांनी उगले यांची कॉलर पकडली. उगले यांनी विठाबाईंचा हात झटकताच उगले यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. संतप्त उगले विठाबाईंशी दोन हात करीत असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी उगले यांना दूर लोटले. यावेळी विठाबाई यांचा मुलगा अशोक याला उगले यांनी रागाच्या भरात एक ठोसा लगावला. भाजपा नगरसेवक दया गायकवाड, शिवसेना नगरसेविका छाया वाघमारे यांनी उगले यांना आवरण्याचा प्रयत्न केला. नगरसेवकाला काही किंमत आहे की नाही असा संतप्त सवाल उगले यांनी केला. अशोक याने उगले यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. तोवर विठाबाई यांनी सुरक्षारक्षकांसमोर कॉलर पकडल्याचा दावाही उगले यांनी केला. माझ्याविरूद्ध राजकीय षड््यंत्र सुरू असल्याचा आरोपही उगले यांनी केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले. नंतर रक्तदाब वाढल्याने अशोक रूग्णालयात दाखल झाला. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान उगले यांच्या विरोधात मनसेच्या माजी नगरसेविका मनिषा डोईफोडे यांनी उपोषण केले होते. उगले यांनी मनिषा यांच्या विरोधात अपशब्द व जातीवाचक शब्द वापरल्याने उगले यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण ताजे असताना आता उगले यांच्या दिशेने तक्रारदार महिलेने चप्पल भिरकावल्याने ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. (प्रतिनिधी) ... हे तर माझ्याविरूद्ध राजकीय षडयंत्र यासंदर्भात उगले म्हणाले, विठाबाईंच्या उपोषणाला मी विरोध केला नसताना त्यांनी सुरक्षा रक्षकांच्यासमक्ष माझी कॉलर पकडली आणि माझ्यावर चप्पल भिरकावली. या प्रकरणामागे राजकीय षंड्यंत्र आहे. फडके रोडवरील ओपन जिमच्या वेळी मला मदन दराडे व मनिषा डोईफोडे यांनी विरोध केला होता. माझा कार्यक्रम उधळून लावला होता. तेव्हापासून माझ्या विरोधात संबंधित व्यक्ती तक्रारी करीत आहेत. डोईफोडे नगरसेविका असताना त्यांच्या विकास कामाला मी कधी विरोध केला नाही. मग त्यांनी माझ्या विकासकामांना विरोध करण्याचे कारण काय?