शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

महिलेला विवस्त्र करून मारहाण

By admin | Updated: February 6, 2015 03:36 IST

पाच-पंचवीस गावगुंड आणि या टोळीचा म्होरक्या खुद्द गावचा सरपंच. ती रडली, ओरडली, परंतु गावगुंडांचा राग ‘आमच्याविरुद्ध उपोषण करते का ?’ चा जाब विचारत विवस्त्र करुन धिंड काढूनच शमला.

अमानुष शिक्षा : सरपंचासह राष्ट्रवादीच्या नेत्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; सर्व आरोपी फरारदत्ता थोरे/संदीप अंकलकोटे - लातूर गेल्या तीन वर्षांपासून ग्रामपंचायत आणि गावगुंडांशी लोकशाही मार्गाने लढा देत अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या बोरगावच्या (ता. चाकूर) ‘रणरागिणी’ला काय बक्षीस मिळाले, तर भर चौकात गावगुंडाकडून विवस्त्र करुन मार खाण्याचे ! पाच - सहा महिलांसह पाच-पंचवीस गावगुंड आणि या टोळीचा म्होरक्या खुद्द गावचा सरपंच. ती रडली, ओरडली, परंतु गावगुंडांचा राग ‘आमच्याविरुद्ध उपोषण करते का ?’ चा जाब विचारत विवस्त्र करुन धिंड काढूनच शमला. लातूर जिल्ह्णातील बोरगावमधील बुधवारी रात्रीच्या या घटनेने मराठवाडा हादरून गेला आहे. येथील दलित महिलेच्या दारासमोर ग्रामपंचायतीने तारेचे कुंपण घातले होते. घरात प्रवेश करायला दारच नसल्याने महिलेने चाकूर तहसीलसमोर उपोषण केले. तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला नोटीस पाठवून ते तारेचे कुंपन काढून टाकण्याचे आदेश दिले. आठ दिवसांत आम्ही ते कुंपण काढू असे ग्रामपंचायतीने तहसीलदारांना कळविले. परंतु बुधवारी रात्री ते कुंपण न काढता सरपंच गोपाळ कानवटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते विनायक भोसले यांच्यासह दहा मातंग समाजाच्या लोकांनी तिच्यावर हल्ला केला. तिला शिवीगाळ आणि मारहाण सुरु केली. यात तिच्या अंगावरचे कपडे फाटले व विवस्त्र करुन फरफटत नेण्यात आले. या घटनेनंतर भेदरलेली महिला अर्धनग्न अवस्थेत चाकूर ठाण्यात दाखल झाली. जोपर्यंत आरोपींना पोलीस अटक करणार नाहीत, तोपर्यंत मी कपडेच घालणार नाही, असा पावित्रा घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांनी चाकूर पोलीस ठाणे गाठले. समजूत काढून तिला कपडे घालायला लावले. गुरुवारी पहाटे चार वाजता सरपंच गोपाळ कानवटे व विनायक भोसले श्रीपती कवडे, संग्राम कवडे, अशोक कवडे, शत्रुघन कवडे, तानाजी कवडे, बालाजी कवडे, धनाजी कवडे, उत्तम कवडे, तानाजी कवडे, सुधाकर कवडे व इतर सात ते आठजण यांच्याविरुद्ध कलम ३५१ (बी) ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात केला. यातील सरपंच गोपाळ कानवटे व विनायक भोसले यांच्याविरुध्द अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये अतिरिक्त कलम लावण्यात आले. हे सर्व संशयित आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, उपविभागीय अधिकारी वैशाली शिंदे यांनी गुरुवारी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. आवाज उठविल्यानेच त्रास देण्याचा प्रयत्नलातूर : ग्राम पंचायतीने दिलेल्या जागेव्यतिरिक्त अनेकांनी अतिक्रमण केले़ मात्र, केवळ आकसापोटी आपल्याच घरासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह बांधण्याचा घाट घालण्यात आला़ आपल्याला रस्ताच सोडण्यात आला नाही़ याविरोधात आवाज उठविल्यानेच अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा आरोप पिडीत महिलेने केला आहे़