शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

विझक्राफ्टवर अखेर गुन्हा दाखल

By admin | Updated: February 27, 2016 03:01 IST

महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट या

मुंबई : महाराष्ट्र रजनी कार्यक्रमात लागलेल्या आगीप्रकरणी सादर केलेल्या अहवालात आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते. या दोन्ही कंपन्यांना जबाबदार धरलेले असतानाही डी.बी. मार्ग पोलिसांनी केवळ विझक्राफ्ट कंपनीविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे. गिरगाव चौपाटी येथे १४ फेब्रुवारी रोजी आयोजित ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रमात लागलेली आग सदोष वायरिंगमुळे लागल्याचे अग्निशमन दलाच्या अहवालातून समोर आले. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात रोशणाई, एलईडी, फ्लेक्स, साऊंड सिस्टम, कॅमेरे आदीसाठी स्वतंत्र वायरिंग होती़ सुरक्षेची खबरदारी न घेताच या वायरिंगचे जाळे स्टेजच्या आसपास व परिसरात लटकत होते़ यापैकी एखाद्या वायरिंगमधून उडालेल्या आगीच्या ठिणग्या ज्वलनशील वस्तूंच्या संपर्कात आल्याने आग भडकली, असा निष्कर्ष अग्निशमन दलाने काढला आहे़ त्यात १५ गॅस सिलिंडर व अन्य ज्वलनशील वस्तूंचा साठा स्टेजखाली असल्याने ही आग वेगाने पसरल्याचे अग्निशमन दलाने पालिकेला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले होते. या प्रकरणी आयोजक कॉन्फिड्रेशन आॅफ इंडिया इंडस्ट्रीज आणि इव्हेंट मॅनेजमेंट विझक्राफ्ट इंटरनॅशनल एंटरटेनमेंट या कंपनीला जबाबदार धरण्यात आले होते. दरम्यान, अहवालानुसार विझक्राफ्ट कंपनी आगीला जबाबदार असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी विझक्राफ्टविरुद्ध डी.बी. मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील ३३६, २८५ कलमान्वये गुन्हा नोंदवला. निष्काळजीपणामुळे उपस्थित सर्वांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, स्टेजखालील ज्वालाग्रही पदार्थांमुळे उद्भवणारा संभाव्य धोका माहीत असूनही सुरक्षेच्या उपाययोजना न करणे असा आरोप कंपनीवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत ७ ते ८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. डी.बी. मार्ग पोलीस विझक्राफ्ट कंपनीतील महाराष्ट्र रजनीचे काम करणारा नेमका अधिकारी, कर्मचाऱ्यांची चौकशी करणार आहेत. (प्रतिनिधी) संपूर्ण कंपनी आगीला जबाबदार नाही. जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी दिली.