शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कामे न करताच ‘स्मार्ट’ बनवाबनवी

By admin | Updated: June 28, 2016 00:42 IST

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून मोठया जल्लोषात शुभारंभ करण्यात आला

पुणे : शहरामध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या १४ प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रिमोटने बटन दाबून मोठया जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. देशभर हा लाइव्ह कार्यक्रम दाखविण्यात आला, प्रत्यक्षात त्यापैकी अनेक प्रकल्पांच्या कामाचा अजून पत्ताच नसतानाच केवळ उद्घाटनाचा बार उडवून देण्यात आल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले आहे.पंतप्रधानमंत्र्यांचा कार्यक्रमाचा गाजावाजा करण्यासाठीच एकाच वेळी १४ प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत औंध-बाणेर-बोलवाडी भागाची मॉडेल एरिया म्हणून निवड करण्यात आली आहे. या भागातील ३ प्रमुख प्रकल्पांचे मोदी यांनी उद्घाटन केले. त्यामध्ये बाबासाहेब आंबडेकर वसाहतीचे पुर्नवसनाच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्ष तेथील कामास सुरूवात होणे अपेक्षित होते. एसआरए अंतर्गत त्या कुटुंबियांचे पुर्नवसन केले जाणार असल्याचे योजनेत स्पष्ट करण्यात आले होते. मात्र एसआरए योजना राबविण्यापूर्वी तेथील नागरिकांची ७५ टक्के मान्यता घेणे आवश्यक आहे. नागरिकांचा विरोध असतानाही या प्रकल्पाचे उद्घाटन झाले आहे. त्याठिकाणी समाजकल्याण सभागृह, अंगणवाडी उभारण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे, पण उद्घाटन झाले आता काम कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पादचारी मार्ग व सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्याचाही पत्ता नाही.पीमएपी प्रवाशांसाठी मोबिलीटी कार्ड उपलब्ध करून देण्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्यक्षात हे कार्ड कधी मिळणार याची चौकशी केली असता मोबिलीटी कार्ड छापून तयार आहेत मात्र पीएमपीच्या संबंधित काम बघणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली झाल्याने नागरिकांना मिळण्यास उशीर होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बसचे वेळापत्रक सांगणारे मोबाइल अ‍ॅप मिळण्यासही अद्याप बराच कालावधी लागणार आहे. माहिती घेऊन सांगतो स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समन्वय अनिल पवार यांच्याकडे याबाबत उद्घाटन झालेली अनेक कामे कधी सुरू होणार आहेत याची चौकशी केली असता त्यांनी बाहेरगावी असून माहिती घेऊन सांगतो असे उत्तर दिले.तरूणांना रोजगारप्रशिक्षण देण्यासाठी औंध क्षेत्रिय कार्यालयात लाइट हाऊस उभारले आहे, चौकशी केली असता याअंतर्गत नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे काम यापुर्वीच सुरू केले आहे असे नागरवस्ती विभागाचे अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.