शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नूतनीकरणाची अट नसताना अपंग प्रवाशांना भुर्दंड

By admin | Updated: June 13, 2016 23:29 IST

बाळासाहेब जाधव ल्ल लातूर अपंगांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण झाले नसल्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवास भाडे आकारले जात आहे़

बाळासाहेब जाधव ल्ल लातूरअपंगांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण झाले नसल्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवास भाडे आकारले जात आहे़ ५ वर्षातून एकदा नूतनीकरण करण्याची पद्धत होती़ मात्र आता ती पद्धत रद्द करण्यात आली आहे़ परंतू, काही वाहक अपंग प्रवाशांची अडवणूक करून त्यांच्याकडून १०० टक्के भाड्याची वसुली करीत आहेत़ गेल्या महिनाभरात १५ अपंगांनी महामंडळाकडे तक्रार करूनही प्रवासीभाडे आकारले जात आहे. राज्य शासनाने अंध व अपंग व्यक्तींना ७५ टक्के व त्यांच्या साथीदारांना ५० टक्के प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय आहे़ या सवलतीसाठी अपंग कल्याणचे आयुक्त अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे प्रवास भाड्यातील सवलत दिली जाते. पास व प्रमाणपत्राचे नूतनीकरण करण्याचा कालावधी ५ वर्षाचा देण्यात आला होता़ परंतू, आता ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. एकदा प्रमाणपत्र दिल्यानंतर नूतनीकरणाची गरज नाही, असा शासन निर्णय आहे. परंतु, लातूर महामंडळाच्या बसेस अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवासी भाडे घेत आहेत.जिल्ह्यात ५ आगाराअंतर्गत एप्रिल २०१५ ते २०१६ या कालावधीत अस्थिव्यंग १ हजार ४३१, कर्णबधीर ४१०, अंध ६९५, मतिमंद ३०६ अशा एकूण २ हजार ८४२ अपंगांकडे प्रमाणपत्र आहे. यातील १५ जणांनी एस.टी. प्रशासनाकडे १०० टक्के भाडे आकारले जात असल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे. परंतु, प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नाही. नूतनीकरणाची अटच नसताना सवलतीचा लाभ मिळत नसल्याचे अपंग प्रवाशांनी प्रशासनाकडे सांगितले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.