शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट नसल्याने गमावला जीव

By admin | Updated: February 8, 2016 02:02 IST

शासनाने केलेल्या हेल्मेटसक्तीमुळे पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुणे शहरात हेल्मेटच्या वापराबाबत भिन्न मतप्रवाह असून काहींनी हेल्मेटच्या वापराला विरोध केला आहे

पुणे : शासनाने केलेल्या हेल्मेटसक्तीमुळे पुणे शहराचे तापमान वाढले आहे. पुणे शहरात हेल्मेटच्या वापराबाबत भिन्न मतप्रवाह असून काहींनी हेल्मेटच्या वापराला विरोध केला आहे, तर काहींनी हेल्मेटसक्तीचे समर्थन केले आहे. अशातच धानोरी-विश्रांतवाडी रस्त्यावर गोकुळनगरमध्ये शनिवारी (दि.६) रात्री अकराच्या सुमारास कारने उडवल्याने जखमी झालेला दुचाकीस्वार रुग्णालयात नेण्यापूर्वीच गतप्राण झाला. या दुचाकीस्वारानेही हेल्मेट परिधान केलेले नव्हते, तसेच त्याच्या डोक्याव्यतिरीक्त कुठेही दुखापत झालेली नव्हती. सुनीलकुमार लल्लन तिवारी (वय ३५, रा.मुंजाबावस्ती, धानोरी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सुनीलकुमारवर रविवारी (दि.७) सायंकाळी सहाच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)सुनीलकुमारच्या डोक्याला इजा झाली होती, मात्र त्याच्या डोक्यातून जास्तीचा रक्तस्त्राव होत नव्हता. कदाचित त्याच्या डोक्याला अथवा मेंदूला गंभीर इजा झाल्याने मृत्यु झाला असण्याची शक्यता असून त्याने जर हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याला गंभीर दुखापत झाली नसती. तसेच घटनास्थळी पोहचून त्याला रुग्णालयात नेईपर्यंत २५ मिनीटांचा कालावधी लागला. अपघातानंतर तेथे जमलेल्या नागरीकांनी तत्परता दाखवून त्याला रुग्णालयात तत्काळ भरती केले असते तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, तसेच असे सुनीलकुमारला रुग्णालयात नेणारे धनंजय जाधव यांनी सांगितले. सुनीलकुमारचा अपघात झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच तरुण व तरुणी असलेले २ अज्ञात डॉक्टर मदतीसाठी पुढे आले. यातील डॉक्टर तरुणाने तर अक्षरश: सुनीलकुमारच्या तोंडात तोंड घालून श्वास देण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर सर्वजण अक्षरश: ढसाढसा रडले अन तशातच आपले नाव न सांगता दोन्ही डॉक्टर तरुणतरुणी तेथून निघून गेले. सुनीलकुमारला उडवून पसार झालेल्या इनोव्हाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून व इतर माहितीद्वारे या कारचा शोध घेतला जात असल्याची माहिती विश्रांतवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट सुपेकर यांनी दिली.