शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बारा दिवसांत संपले दीड टीएमसी पाणी

By admin | Updated: May 18, 2016 00:41 IST

खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे.

पुणे : जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी खडकवासला धरणसाखळीतून गेल्या १२ दिवसांत तब्बल १.५० दक्षलक्ष घनमीटर (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. त्यातील ०.४० टीएमसी पाणी पुणे शहरासाठी सोडण्यात आले. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांमध्ये अवघा ३.५० टीएमसी पाणी शिल्लक राहिला आहे. दौंड साठी ४ मे रोजी पाणी सोडण्यात आले होते, त्या वेळी या चारही धरणांमध्ये सुमारे ५.०४ टीएमसी पाणीसाठा होता. तो मंगळवारी (दि. १७) सकाळी ३.५४ टीएमसी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. उर्वरित पाण्याचे बाष्पीभवन, पालखीसाठी पाणी, दोन मोठ्या टाऊनशिपसाठी पाणी तसेच धरणाचा शिल्लक साठा याचे कशा प्रकारे केले जाणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील वर्षी जेमतेम ५० टक्के धरणे भरल्याने या चारही धरणांत केवळ ५० टक्केच पाणीसाठा होता. हे सर्व पाणी पुणे शहरासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील ३२ गावांसह दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी सुमारे १.६० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर सर्व पाणी पुणेकरांसाठीच ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात या गावांमध्ये पुन्हा पाणी सोडण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे या गावांना केवळ अर्धा टीएमपी पाणी सोडण्यात येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे पाणी एक टीएमसी असेल, असे सांगण्यात आले. त्याला राजकीय पक्षांचा विरोध असतानाही ४ मेपासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून, १९ मेपर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. (प्रतिनिधी)कालव्यातून १,२०० क्युसेक्सने पाणी४ मे रोजी पाणी कालव्यातून सोडण्यात आले, त्या वेळी ६०० क्युसेक्सने ते सोडण्यात येत होते. त्यानंतर आजअखेर १,२०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे.वरसगाव-टेमघरने गाठला तळया धरणप्रणालीतील वरसगाव आणि टेमघर धरणाने तळ गाठला आहे. ४ मे रोजी वरसगाव धरणात १.१० टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा आजअखेर ०.५२ टीएमसी झाला आहे. तर, टेमघर धरणार १२ दिवसांपूर्वी ०.१७ टीएमसीवर असलेला पाणीसाठी ०.0९ टीएमसीवर आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.