शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

साथ नात्यापलीकडची...

By admin | Updated: August 7, 2016 02:22 IST

कॉलेजमधले दिवस म्हणजे आयुष्यातील सोनेरी दिवस. शाळेच्या शिस्तीतून, युनिफॉर्ममधून सुटका होऊन एका नवीन आयुष्याची, करिअरची सुरुवात होते. यात साथ मिळते

- पूजा दामलेकॉलेजमधले दिवस म्हणजे आयुष्यातील सोनेरी दिवस. शाळेच्या शिस्तीतून, युनिफॉर्ममधून सुटका होऊन एका नवीन आयुष्याची, करिअरची सुरुवात होते. यात साथ मिळते ती मैत्रीची, बोले तो अपने भिडू लोग की... कॉलेजमध्ये असताना रोजच्या रोज भेटणारी मित्रमंडळी नोकरी, व्यवसायाच्या रगाड्यात कुठे लांब जातात (अं... लांब म्हणजे नोकरीसाठी), ते कळतही नाही. काही दिवसातच याची सवय होते, पण तरीही आयुष्यातले त्यांचे स्थान बदलत नाही. ‘ती’ मैत्री तशीच राहते. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर नवीन लोक आयुष्यात येत असतात. त्यातून मित्र-परिवार वाढत जातो. प्रत्येक टप्प्यावर नवीन मित्र होणे, ही सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण प्रत्येक टप्प्यावर एकच मित्र टिकून राहणाऱ्याला ‘भाग्यवान’ असे म्हटले जाते. कॉलेजमध्ये असताना आॅगस्ट महिना सुरू झाल्यावर सर्वांनाच वेध लागतात ते ‘फ्रेंडशिप डे’चे. आपली मैत्री सेलिब्रेट करण्यासाठी विविध प्लॅन असतात. म्हणजे बेस्ट फ्रेंडसाठी वेगळा जरा हटके ‘फ्रेंडशिप बँड’ आणि त्याचबरोबर एखादे छोटेसे गिफ्ट, एखादे चॉकलेट आणि मग बाकीच्या फ्रेंडसाठी टिपिकल कलर्सचे म्हणजे गुलाबी, लाल किंवा पांढऱ्या रंगाचे फ्रेंडशिप बँड. काही वेळा स्केचपेन, मार्करने कपड्यांवर, हातावर लिहिणे हा फंडापण हिट होता, पण अनेकदा कॉलेजमध्ये चालत नसल्यामुळे कॉलेज संपल्यावर असे प्रताप केले जायचे. आणि महिन्याची सुरुवात असल्यामुळे खिशात असणाऱ्या थोड्या-फार पैशातच (त्या वेळची सो कॉल्ड मोठी पार्टी) पार्टी व्हायची, पण आता हे सगळे दिवस आठवणीत उरले आहेत. शाळा, कॉलेजमध्ये झालेली मैत्री ही नात्यापलीकडची असते. यात कोणत्याच गोष्टींचा अडथळा नसतो. कारण त्यात कोणताही स्वार्थ, स्पर्धा नसते. कॉलेजच्या मित्रांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, हे खरेय. मी आयटी फिल्डमध्ये नोकरी करतो. आयटी इंजिनीयरिंग करताना धम्माल फ्रेंडशिप डे सेलिब्रेट केले आहेत. तेव्हाचे फोटो आता फ्रेंडशिपडेला फेसबुकवर टाकून मित्रांना टॅग करतो. त्यावरच्या कमेंट्स वाचतानाही धम्माल येते. आजच्या फ्रेंडशिप डेचा काही खास प्लॅन केलेला नाही, पण जमल्यास संध्याकाळी मित्रांना भेटीन. खर सांगायचे, तर आता मित्र भेटतात, तोच फ्रेंडशिप डे असतो, असे आयटीच्या खासगी कंपनीत जॉब करणाऱ्या समीप परब यांनी सांगितले. बी.फार्मच शिक्षण मुंबईतच झाले. लहानपणापासून मुंबईतच असल्यामुळे तिथे मोठे फ्रेंड सर्कल आहे, पण पुढच्या शिक्षणासाठी आता गेले दोन वर्षे अमेरिकेत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईला आलो होतो. तेव्हा एक दिवस सगळा गु्रप भेटला होता, तोच माझा फ्रेंडशिप डे. अमेरिकेतही नवीन गु्रप झाला आहे. इथेही फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करणार आहे, असे अनुराग गाडगीळने सांगितले.एमबीबीएससाठी मी मॉस्कोला गेलो होतो. त्यामुळे मुंबईत आणि मॉस्को अशा दोन्ही ठिकाणी फ्रेंड सर्कल आहे. मॉस्कोला असणाऱ्या फ्रेंडस्शी वेगळे ट्युनिंग आहे. तिथे आम्ही सर्वच जण नवीन होतो. वेगवेगळ््या देशातून आलो होतो, पण तेव्हा त्यांचाच आधार होता. ते दिवस खूप एन्जॉय केले आहेत आणि तितका अभ्यासही केला आहे. सध्या अजून नवीन फ्रेंड्स मिळाले आहेत, त्यांच्याबरोबरच हा फ्रेंडशिप डे साजरा करेन, पण बाकीच्या फ्रेंड्सना आॅनलाइन विश करणार असल्याचे डॉ. अमेय कुंटे याने सांगितले.