शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडात अवकाळी पाऊस !

By admin | Updated: January 2, 2015 00:29 IST

गारपीटीने खरीप, रब्बीपिकासह फळे, भाजीपाला पिकाचे नुकसान.

अकोला : अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. तीनही जिल्ह्य़ात बुधवारी झालेल्या गारपीटीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता.बुधवारी रात्री व आज सकाळी अवकाळी पावसाने अकोला जिल्हयाला झोडपले. पावसामुळे खरीप, रब्बीसह भाजीपाला, फळ पिकांचे नुकसान झाले आहे. वारा आणि पावसामुळे जिल्हयासह शहरातील विजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. आज दिवसभर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आज सकाळी ८.३0 वाजतापर्यंत जिल्ह्यात ३७.५ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. *बुलडाणा हरवले धुक्यातबुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, नांदूरासह बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, इरला परिसरात गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. १ जानेवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ४३.७ मिमी पावसाची नोंद झाली असुन दुपारी ४ वाजता बुलडाणा शहर धुक्यामध्ये हरवून गेले होते. संग्रामपूर तालुक्यातील वकाणा, रूधाना, काकोडा, बोडखा, पळशी, संग्रामपूर शिवारातील कांदा पिक उदध्वस्त झाल्यात जमा आहेत. शेगाव खामगाव परीसरात आज सकाळी जोरदार पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे बुलडाणा परिसरातील २८ हजार हेक्टर क्षेत्र पिकाला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. *वाशिम जिल्ह्यात फळबागांना फटकाबुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने वाशिम जिल्ह्यात फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हयात सरासरी ७.१७ पावसाची नोंद आहे. मालेगाव तालुक्यातील मेडशी या भागात बोराएवढी गारा पडल्या आहेत. मेडशी , कारंजा व मंगरूळपीर व मानोरा परिसरातही गारपीट झाली. १ जानेवारी रोजी जिल्हयात ७.१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.