शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी पाहुण्यांचे ‘हिवाळी संमेलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 04:47 IST

राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यामधील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली आहे.

अझहर शेख, नाशिक राष्ट्रीय पक्षी अभयारण्याचा दर्जा प्राप्त असलेल्या निफाड तालुक्यामधील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जलाशयावर देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या हिवाळी संमेलनाला सुरुवात झाली आहे. विजयादशमीचा सण साजरा होताच विविध प्रजातीच्या पक्ष्यांनी सीमोल्लंघन करत नांदूरमधमेश्वरचे जलाशय गाठण्यास सुरुवात केली असून, सध्या येथे देशी-विदेशी पक्ष्यांचा मेळा भरला आहे. स्थानिक स्थलांतरित पक्षी जणू यजमानाच्या भूमिकेत असून, पाहुण्यांचे स्वागत करत असल्याचे किलबिलाटावरून लक्षात येते. नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक थंडीचा तालुका म्हणून निफाडची ओळख आहे. जिल्ह्यासह निफाडमध्ये जोरदार पाऊस झाल्याने थंडीचे दमदार आगमन झाले आहे. निफाडच्या हद्दीत पोहचताच सकाळी बोचऱ्या थंडीचा अनुभव येतो. सद्यस्थितीत सुमारे २० प्रकारचे पक्षी नांदूरमधमेश्वर अभयारण्यात विहार करताना दिसून येत आहेत. नांदूरमधमेश्वर अभयारण्याकडे पक्षी येण्याचे प्रमाण वाढू लागल्याने परिसर पक्ष्यांच्या आवाजाने गजबजू लागला आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींनाही मोह आवरता येत नसून ‘वीकेण्ड प्लॅन’साठी येथील पक्षी अभयारण्याला हौशी व अभ्यासू पक्षीप्रेमींकडून भेट दिली जात आहे.आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पक्ष्यांची संख्या अभयारण्यामध्ये वाढू लागल्याचे येथील युवा पक्षी निरीक्षक अमोल दराडे, शंकर लोखंडे यांनी सांगितले. गेल्या वर्षी नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये सोईसुविधांची मोठ्या प्रमाणात वानवा होती. मात्र, नाशिक वनविभागाने (वन्यजीव) यंदा विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. चापडगावला पक्षी अभयारण्यालगत वनविभागाने उद्यान उभारले असून, येथे इको हट, इको कॅन्टिन, प्रसाधनगृहे, तंबू निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षण मनोऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. पक्षीनिरीक्षण गॅलरीचा मजलाही वाढविण्यात आला असून, मजबुतीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी सुसज्ज वाहनतळ व प्रतीक्षागृहही उपलब्ध झाले आहे.