शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

रितेशच्या ‘लय भारी’ संवादाने जिंकले

By admin | Updated: July 9, 2014 01:04 IST

मी हिंदी चित्रपटातून समोर आलो हे सर्वांनाच माहिती आहे. मी मराठी कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे हिंदीत काही चित्रपट केले तरी मला मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच.

लोकमत सखी मंच : युवा नेक्स्टच्या सदस्यांशी अभिनेता रितेश देशमुखचा मनमोकळा संवाद नागपूर : मी हिंदी चित्रपटातून समोर आलो हे सर्वांनाच माहिती आहे. मी मराठी कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे हिंदीत काही चित्रपट केले तरी मला मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा होतीच. पण मला हव्या असलेल्या एखाद्या वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेसाठी मी थांबलो होतो. ‘लय भारी’ चित्रपटात मला जशी हवी होती तशीच जरा आव्हानात्मक आणि वेगळी भूमिका मिळाली. त्यामुळे योग्य वेळी मी मराठी चित्रपटात आलो आहे. विशेष म्हणजे ही भूमिका मला माझ्या मराठी भाषेत करता आली, याचे समाधान खूप मोठे आहे. यावेळी त्याच्या ‘लय भारी’ संवादाने उपस्थितांना जिंकले. लोकमत सखी मंच आणि युवा नेक्स्टच्या निवडक सदस्यांशी त्याचा हा संवाद लोकमत भवनातील दर्डा कलाविथिकेत आयोजित करण्यात आला. याप्रसंगी रितेशनेही सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. याप्रसंगी रितेश देशमुखसह ‘लय भारी’ चित्रपटातील कलावंत शरद केळकर, आदिती पोहनकर, निर्माते अमेय खोपकर, झी मराठीचे निखिल साने प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदीत विनोदी आणि शांतप्रकारच्या भूमिका केल्यानंतर ‘लय भारी’ यात वेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या. यात मराठी आणि हिंदीत काय फरक जाणवतो? असे विचारले असता त्याने प्रत्येकच भूमिका कलावंतासाठी आव्हान असते. आतापर्यंत प्रत्येकच भूमिका मला महत्त्वाची वाटली, कारण मला त्या भूमिकेला न्याय द्यायचा होता. चित्रपटात भूमिकेप्रमाणे आपण वाटायला हवे म्हणून प्रयत्न करावे लागतात. ‘लय भारी’ हा अतिशय वेगळा आणि तांत्रिकदृष्ट्या समृद्ध चित्रपट मराठीत जवळपास १५ वर्षांनंतर येतो आहे. हा चित्रपट आणि यातील भूमिका ‘लार्जर दॅन लाईफ’आहे. हा मराठीतला एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास वाटतो. याशिवाय मराठीत या भूमिकेत लोक मला स्वीकारतात की नाही, हे आता कळेलच. यावेळी आदिती म्हणाली, यापूर्वी मालिका आणि जाहिरातीत काम केले आहे, पण चित्रपटात प्रथमच काम केले. रितेशसह मला बरेच शिकता आले. शरद केळकरने यावेळी आपल्या भारदस्त आवाजाने जिंकले. उपस्थितांच्या आग्रहास्तव रितेशने गीत सादर केले. लोकमत नागपूरचे महाव्यवस्थापक नीलेश सिंग यांनी कलावंतांचे स्वागत तर नेहा जोशी यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)