शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
4
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
5
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
6
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
8
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
9
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
10
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
11
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
12
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
13
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
14
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
15
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
16
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
17
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
18
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
19
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
20
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2017 चे विजेते

By admin | Updated: April 12, 2017 00:00 IST

अवलिया कलावंत अशोक हांडे यांना यंदाच्या परफॉरमिंग आर्ट (Performing Arts) विभागातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.देशातील सर्वात मोठ्या स्फोटक उत्पादक सोलर समूहाचे सर्वेसर्वा सत्यनारायण नुवाल ...

अवलिया कलावंत अशोक हांडे यांना यंदाच्या परफॉरमिंग आर्ट (Performing Arts) विभागातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि भरत दाभोळकर यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

देशातील सर्वात मोठ्या स्फोटक उत्पादक सोलर समूहाचे सर्वेसर्वा सत्यनारायण नुवाल यांना यंदाचा बिझनेस विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉक्टर एकनाथ खेडकर आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात लढवय्ये आमदार अशी ओळख असलेले ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना यंदाच्या राजकारण विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील सूद आणि डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुगल ए आजम हे नाटक धाडसाने रंगमंचावर आणून नाट्यरसिकांना त्या प्रेमकथेच्या जिवंतपणाचा भव्य साक्षात्कार घडवणारे फिरोज खान यांना रंगभूमीवरील योगदानासाठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. झी मराठी न्यूज चॅनेलचे संपादक उदय निरगुडकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

५०० किलो वजनाची जगातील सर्वांत लठ्ठ महिला इमान अहमदवर उपचारासाठी पुढाकार घेणारे डॉ. मुफ्फझल लकडावाला यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पायाभूत सुविधा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे रिजन्सी समूहाचे संस्थापक अध्यक्ष महेश अग्रवाल यांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे गृह राज्यमंत्री राम शिंदे आणि सुधीर कुमार यांच्या हस्ते अग्रवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे नितीन जोशी यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर सोहळ्यात ग्लोबल टोर्चबेअरर या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हरिभाऊ बागडे आणि अभिनेता अतुल परचुरे यांच्या हस्ते नितीन जोशी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळयात जीवन विद्या मिशनच्या प्रल्हाद पै यांना समाजभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय राजनाथ सिंह मंचावर उपस्थित होते.

देशाचे राष्ट्रपतीपद भूषवणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन आणि देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिभाताई पाटील यांनी 2007 ते 2012 या काळात देशाच्या राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता.

महाराष्ट्राचा मांझी अशी ओळख असलेले अहमदनगरचे राजाराम भापकर गुरुजी यांना यंदाचा लोकसेवा-समाजसेवा विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला .एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आमिर खानच्या दबंगमधील गीता आणि बबिता या फोगट बहिणींप्रमाणेच शेतकऱ्याची मुलगी ते आंतराष्ट्रीय कुस्तीपटू अशी वाटचाल करणारी कोल्हापुरची कुस्तीपटू रेश्मा अनिल माने हिने यावर्षीचा क्रीडा क्षेत्रातील महाराष्ट्रीयन ऑफ द इयर मान पटकावला.

प्रशासकीय विभागात उल्लेखनीय कामगिरी करणारे नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या कामाची दखल घेत त्यांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. अभिनेता दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय चित्र-शिल्पकार संदीप पिसाळकर यांचा कला क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते पिसाळकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बॉलिवूडमध्ये मराठी झेंडा रोवणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरले आहेत. चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी "महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उषा काकडे गजेंद्र चौहान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

नाटक चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकेतून आपल्या अभिनयकौशल्याने रसिकप्रेक्षकंची मने जिंकणा-या सुकन्या कुलकर्णी-मोने यांना रंगभूमी स्त्री विभागातील यंदाचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे.डॉक्टर उल्हास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवणारे महाराष्ट्राचे विक्रमवीर वनमंत्री यशस्वी वित्तमंत्री आणि भाजपाचे विदर्भातील दिग्गज नेतृत्व असलेले सुधीर मुनगंटीवार सर्वात प्रभावी राजकारण्यांमधील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरले. अभिनेते रझा मुराद यांच्या हस्ते मुनगंटीवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरद पवार यांच्यानंतरचे महाराष्ट्रातील दुसरे तरुण मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपाचे पहिले मुख्यमंत्री ठरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यादरम्यान विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ट्रेंडसेटर एंटरटेन्मेंट पुरस्काराने गौरविण्यात आले. अॅड. उज्ज्वल निकम डॉ. एकनाथ खेडकर(कुलगुरू अजिंक्य डी. वाय. पाटील युनिवर्सिटी पुणे) आणि ब्राईट आऊटडोअरचे प्रमुख योगेश लखाणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

सैराटमधील जबरदस्त अभिनयाच्या जोरावर आर्ची उर्फ रिंकू राजगुरूने महाराष्ट्रात आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला. या जोरावरच ती यंदाची चित्रपट महिला कलाकार विभागातील लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर ठरली. ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते रिंकूला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

अभिनेता रणबीर कपूरला लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार-2017 मधील आऊटस्टॅडिंग एन्टरटेनर ऑफ द इयर (पुरुष) कॅटेगरीतील पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ‘कसं काय मुंबई’अशी साद रणबीरने घातली. मुंबईनेच मला घडवल असे सांगत त्याने लोकमतचे विशेष आभार मानले. अनुज पोद्दार बिझनेस हेड कलर्स मराठी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर हा सोहळा मुंबईच्या स्टार सहारा हॉटेलमध्ये 11 एप्रिल 2017 रोजी दिग्गजांच्या उपस्थितीत झोकात पार पडला. यावेळी अभिनेत्री आलिया भट्ट हिला आऊटस्टॅडिंग एंटरटेनर (महिला) पुरस्कारने गौरवण्यात आलं. महिंद्रा अॅन्ड महिंद्रा लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पवन गोयंका यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.