शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाचे सोडत विजेते रडकुंडीला, अडीच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 06:26 IST

म्हाडाने अडीच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विविध मूलभूत सुविधांची पूर्तता न केल्याने इमारतीच्या ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रस्तावही अद्याप महापालिकेकडे पाठविलेला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे सोडत विजेते रडकुंडीला आले आहेत.

जमीर काझी मुंबई : म्हाडाने अडीच वर्षांपूर्वी काढलेल्या लॉटरीतील विजेत्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. महत्त्वाचे म्हणजे विविध मूलभूत सुविधांची पूर्तता न केल्याने इमारतीच्या ताबा प्रमाणपत्रासाठी (ओसी) प्रस्तावही अद्याप महापालिकेकडे पाठविलेला नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे सोडत विजेते रडकुंडीला आले आहेत.म्हाडाने ३१ मे २०१५ रोजी लॉटरी काढलेल्या मुलुंड गव्हाणपाडाच्या (सोडत क्रमांक ३१३) विजेत्या ठरलेल्यांची ही अवस्था आहे. म्हाडाच्या धिम्या कारभारामुळे २३ मजली टॉवरमधील घराचा ताबा मिळण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्याचबरोबर या घरांच्या, नोंदणी व मुद्रांक शुल्कात वाढ झाल्याने काही लाखांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.मुलुंड गव्हाणपाडा येथे म्हाडाकडून मध्यम उत्पन्न व अल्प उत्पन गट (एमआयजी व एलआयजी) बांधण्यात येत असलेल्या गृहसंकुलांची मे २०१५ मध्ये सोडत काढली. या इमारतीच्या मागील जुनी ट्रान्झिट इमारत हटविल्यानंतर पूर्ण तयार झालेल्या ‘एमआयजी’ गटासाठीच्या २३ मजली इमारतीला सहा महिन्यांपूर्वी पालिकेची ओसी मिळाली. मात्र अद्याप सर्व विजेत्यांना घराचा ताबा मिळालेला नाही. तर ‘एलआयजी’धारकांसाठी बांधलेल्या इमारतीच्या मागे अन्य इमारतीचे काम अपूर्ण असल्याने ‘ओसी’साठी प्रस्ताव बनविला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.अधिकाºयांची सारवासारवमुंबई मंडळाचे कार्यकारी अधिकारी सुभाष लाखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘एमआयजी’ गटाची ताबा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे, ‘एलआयजी’च्या इमारतीला ओसी मिळविण्यासाठी पालिकेकडे प्रस्ताव पाठविल्याचे सुरुवातीला सांगितले. मात्र इतर इमारतीची बरीच कामे व तेथील मूलभूत सुविधा प्रलंबित असल्याने प्रस्ताव कसा जाऊ शकेल, असे सांगितल्यानंतर त्यांनी त्याबाबत सविस्तर माहिती घेतो, अशी सारवासारव करीत दीड महिन्यात ओसी मिळविण्याचा प्रयत्न आहे, असे सांगितले.घरांच्या ताब्यासाठी‘पार्ट ओसी’चा पर्यायपूर्णावस्थेत असलेल्या एका इमारतीची ‘पार्ट ओसी’ मिळविता येऊ शकेल, ती मिळाल्यास ताब्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.