शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

विदर्भात वादळी पावसाचा इशारा

By admin | Updated: May 6, 2015 06:27 IST

विदर्भात बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे : विदर्भात बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी महाबळेश्वर येथे जोरदार पाऊस पडला. वेधशाळेकडे ५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात भर उन्हाळ्यात आठवडाभर पावसाचे सावट राहणार आहे. सोमवारपासून विदर्भात काही भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच राज्यात ठिकठिकाणीही पावसाने हजेरी लावली. बुधवारी विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढील आठवडाभर पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. मंगळवारी राज्यात महाबळेश्वरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. त्या ठिकाणी काही तासांतच ५४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पुण्यातही ४.४ मिमी पाऊस पडला. तसेच पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला़ सातारा येथे ०.१ मिमी पावसाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही पावसाने हजेरी लावली. दरम्यान, तीव्र उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक प्रमुख शहरांतील कमाल तापमानात घट झाली आहे. विदर्भातील उन्हाची तीव्रताही कमी झाली आहे. मंगळवारी राज्यात जळगाव येथे सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यांतील काही प्रमुख शहरांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ४पुणे ३८.६, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३६.४, महाबळेश्वर ३०.१, मालेगाव ४२.८, नाशिक ४०, सांगली ३७.३, सातारा ३७.६, सोलापूर ४०.७, मुंबई ३५, अलिबाग ३५, रत्नागिरी ३४.३, उस्मानाबाद ३८.६, औरंगाबाद ४०, परभणी ४०.४, नांदेड ३८, अकोला ४२.३, बुलढाणा ३९.७, चंद्रपूर ३९, नागपूर ४०.५, वाशिम ३९.६, वर्धा ४०.५, यवतमाळ ३८.२.