शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

हिताच्या तेवढ्याच शिफारशी स्वीकारणार

By admin | Updated: April 10, 2015 04:18 IST

राज्याच्या समतोल विकासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालातील शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यात

मुंबई : राज्याच्या समतोल विकासासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या डॉ. विजय केळकर समितीच्या अहवालातील शिफारशी जशाच्या तशा स्वीकारण्यात येणार नाहीत, असे राज्य शासनाने आज स्पष्ट केले. राज्याच्या हिताच्या असतील त्याच शिफारशी स्वीकारू, असे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज स्पष्ट केले.केळकर समितीच्या अहवालावरील दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले, केळकर समितीने केलेल्या शिफारशींवरील कार्यवाहीसंदर्भात आपल्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती नेमण्यात आली आहे. या उपसमितीचा अहवाल अंतिम करण्यापूर्वी आमदारांशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्यासमोर सादरीकरणदेखील केले जाईल. तज्ज्ञांची मते घेण्यात येतील. केळकर समितीने १४६ शिफारशी केलेल्या आहेत. दरडोई उत्पन्न, रोजगाराच्या संधी आणि एकूण समतोल विकासासंदर्भात उपयुक्त शिफारशीच स्वीकारल्या जातील, मंत्रिमंडळ उपसमितीचा अहवाल येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी तयार होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. सौरऊर्जा धोरण, मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी अशा शिफारशींची अंमलबजावणी सरकारने आधीच सुरू केली आहे. जलसंपदासाठी ३० टक्के निधी राखून ठेवावा, अशी शिफारस समितीने केली आहे. पाच वर्षांत राज्यपालांच्या निर्देशांनुसार निधीचा वापर करावयाचा आहे. भूजल हा महत्त्वाचा घटक मानून प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, अशी चांगली शिफारस समितीने केलेली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांचा समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. केळकर समितीचा उद्देश हा समतोल विकासासंदर्भात वाद वाढविण्याचा वा आजवर असा विकास न होण्यासाठी कोण जबाबदार होते हे शोधण्याचा नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. (विशेष प्रतिनिधी)