शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लहान भाऊ की विरोधी व्हायचे?

By admin | Updated: October 20, 2014 05:28 IST

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात गेली २५ वर्षे भाजपाचा मोठा भाऊ म्हणून वावरलेल्या शिवसेनेचा दरवाजा १५ वर्षांनंतर सत्ता ठोठावत आहे

संदीप प्रधान, मुंबईमुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात गेली २५ वर्षे भाजपाचा मोठा भाऊ म्हणून वावरलेल्या शिवसेनेचा दरवाजा १५ वर्षांनंतर सत्ता ठोठावत आहे. सत्तेकरिता दार उघडले तर लहान भाऊ होऊन मंत्रालयात बसावे लागणार आहे अन्यथा विरोधी बाकावर वाघासारखे बसून सत्ताधारी भाजपावर गुरकावण्याची संधी आहे. यापैकी एक पर्याय शिवसेनेला स्वीकारायचा आहे.शिवसेना गेली १५ वर्षे सत्तेत नसल्याने येणाऱ्या सत्तेला दार उघडावे, अशी त्या पक्षातील अनेकांची अपेक्षा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीतील अंकगणित पाहता शिवसेनेला मंत्रालयात लहान भावाची भूमिका निभवावी लागेल. कमी महत्त्वाच्या खात्यांवर व पदांवर समाधान मानावे लागेल. आतापर्यंत शिवसेनेने रिमोट कंट्रोल चालवायचा आणि भाजपाच्या मंत्र्यांनी मातोश्रीवर पायधूळ झाडायची, असा शिवसेनेचा रौब होता. यापुढे तसे होणार नाही, हे वास्तव पचवून सरकारमध्ये बसायची तयारी करावी लागेल. पाच वर्षे लहान भाऊ राहून सत्ता उपभोगली तर पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेला आणखी गिळण्याचा प्रयत्न करील. त्यातच शिवसेनेकडे मंत्रिपदाची धुरा सांभाळण्याकरिता सक्षम व्यक्तींची वानवा आहे. त्यामुळे सत्ता घेतल्यावर शिवसेनेचे काही मंत्री आरोपांच्या फैरींमध्ये सापडण्याची भीती आहे. अशावेळी भाजपाकडून पाठराखण केली जाण्याची शक्यता धूसर आहे. शिवसेनेचे सत्तेत घेऊन जेवढे खच्चीकरण करता येईल तेवढे भाजपा करील, अशी भीती आहे.शिवसेनेने विरोधी बाकावर बसण्याची भूमिका घेतली तर भाजपाला कदाचित राष्ट्रवादीचा किंवा राष्ट्रवादीत फूट पाडून मोठ्या गटाचा पाठिंबा घ्यावा लागेल. यामुळे भाजपावर हल्ला करण्याची संधी शिवसेनेला मिळू शकेल. मात्र त्याकरिताही सक्षम नेतृत्व शिवसेनेकडे नाही. विरोधी पक्षात राहिल्यावर वेगवेगळी आमिष दाखवून शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न भाजपा करील आणि शिवसेनेच्या नैतिक सामर्थ्याची परीक्षा घेईल, अशी शक्यता आहे.