शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आपण जागे होणार का?

By admin | Updated: July 5, 2015 02:52 IST

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली.

- डॉ. रामचंद्र साबळे(लेखक राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाचे राज्य सल्लागार आहेत.)

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात पावसास सुरुवात झाली आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण फुलले. गेल्यावर्षी ज्या भागात दुष्काळी स्थिती होती, त्या भागातही या वर्षी वरुणराजाने हजेरी लावली. त्यामुळे सगळीकडे समाधान होते. मात्र मराठवाड्यातील वाशिम, परभणी, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात त्या जिल्ह्यातील जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. अद्यापही त्या भागात पाऊस अपुरा असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांसाठी चारा इत्यादी प्रश्न ऐरणीवर आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील विदर्भातील बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांतही तेथील जूनच्या सरासरीपेक्षा पाऊस थोडा कमी झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत काही भागात सरासरीहून अधिक, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात जून महिन्याच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला आणि त्या भागात खरिपातील पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या, तरी तेथील उगवून आलेली पिके पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आता पावसात उघडीप आणि खंड काही काळ जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेरलेली पिके अडचणीत आली आहेत. तेथे पावसाने अधिक ओढ दिल्यास पिके पाण्यावाचून जाणे शक्य असून, तेथे दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. तसेच दुबार पेरणीसाठी निवडावयाची पिके, त्यांच्या जाती आणि बियाण्याची उपलब्धता हे प्रश्न शेती व्यवस्थापनातील महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हाही प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकरी अडचणीत येणार आहेत. बागायत क्षेत्रात या समस्येचे स्वरूप अत्यल्प प्रमाणात राहील. मात्र केवळ १८ टक्केच क्षेत्र महाराष्ट्रात बागायत असल्याने उरलेल्या कोरडवाहू क्षेत्रात आणि दुष्काळी पट्ट्यात या समस्येचे स्वरूप वाढलेले दिसून येईल.या सर्व समस्यांचे स्वरूप हवामान बदलामुळे होत आहे. कमी दिवसात अधिक पाऊस होणे आणि बराच काळ पावसात खंड पडणे, तसेच पावसाचे एकूण दिवस कमी होणे, अशी स्थिती या २१व्या शतकात केवळ हवामान बदलाच्या परिणामाने जाणवत आहे. दुष्काळी पट्ट्यात केवळ तीन आठवड्यांतील ३ ते ४ दिवसांत भरपूर पाऊस होऊन पाणी वाहून जाणे आणि उरलेल्या मान्सून काळात अल्पसा पाऊस होणे, ही स्थिती या शतकाच्या सुरुवातीपासूनच जाणवत आहे. सन १९७२ साली केवळ ८४ तालुके दुष्काळी गणले होते. मात्र सन २०१२ साली १२३ तालुके दुष्काळी होते. म्हणजेच गेल्या ४० वर्षांत ४० हून अधिक तालुक्यांची भर पडत आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने हे चित्र चिंताजनक आहे. तापमानवाढ व हवामान बदल या समस्येस वाहनांच्या संख्येत होणारी वाढ, कारखान्यांच्या संख्येत होणारी वाढ व त्यातून बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साइड, कार्बन मोनोआॅक्साईड आणि विमानांमधून बाहेर पडणारा क्लोरोफ्ल्युरो कार्बन यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. दुसऱ्या बाजूस कार्बन वापरणारी यंत्रणा म्हणजे वनामधील वनस्पतींचे प्रमाण कमी झालेले असल्याने कार्बन वापरणारी यंत्रणा मानवानेच संपुष्टात आणली आहे. त्यामुळे हवेत कार्बन डायआॅक्साइडचे प्रमाण वाढत जाणार आहे. माणसांच्या आरोग्यासाठीही या बाबी भविष्यात घातक ठरणार आहेत आणि ते दिसूनही येत आहे. हे सारे बदल होत असताना उपाय योजण्यासाठी आपण जागे होणार आहोत का?