शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ढिसाळ यंत्रणेवर कारवाई करणार का?

By admin | Updated: December 22, 2015 01:59 IST

पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अ‍ॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे

मुंबई : पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अ‍ॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचा काही विचार आहे का, असा थेट सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. कारवाईचा विचार असेल तर कारवाई कोणत्या स्वरूपाची असेल? असे विचारत उच्च न्यायालयाने यासंदर्भातील तपशील बुधवारी सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी, त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी, याकरिता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे होती.हिट अ‍ॅण्ड रन केसप्रकरणात पोलिसांनी अत्यंत ढिसाळ तपास केल्याने उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेवर ताशेरे ओढत सलमानची संशयाचा फायदा देत सुटका केली.सोमवारच्या सुनावणीवेळी न्या. ओक व न्या. पटेल यांनीही ही बाब सरकारी वकिलांच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारे तपास यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा फायदा घेत एखादा आरोपी सुटला तर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई करता? या केसमधील (२००२ हिट अ‍ॅण्ड रन) दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार केला आहे का? विचार केला असेल तर कोणत्या स्वरूपाची कारवाई करणार? अशी विचारणा करत खंडपीठाने २३ डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला माहिती देण्यास सांगितले आहे.ब्रिदिंग टेस्ट, रक्ताच्या नमुन्यांची चाचणी व रक्त सीलबंद करण्यासाठी काही स्टॅण्डर्ड प्रक्रिया आहे का? त्यासंबंधी काही शासननिर्णय किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? याची आम्हाला तपशीलवार माहिती द्या, असेही निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.रक्ताचे नमुने तातडीने तपासण्याबाबत खंडपीठाने सरकारला सवाल केले. त्यावर मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ग्रामीण भागासाठी फॉरेन्सिल मोबाइल व्हॅन उपलब्ध करण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला दिली.सोमवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने वाहन परवान्याचा मुद्दाही उपस्थित केला. ‘यासारख्या (हिट अ‍ॅण्ड रन) केसमधील आरोपींचा परवाना रद्द का करण्यात येत नाही? कायद्यात परवाना रद्द करण्याची सोय आहे का? गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तीचा परवानाच रद्द करा. जरी त्याने उच्च न्यायालयात अपील केले असले तरी अपिलावरील निर्णय प्रलंबित असेपर्यंत त्याचा परवाना निलंबित करा,’ अशी सूचना खंडपीठाने राज्य सरकारला केली. या याचिकेवरील पुढील सुनावणी २३ डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे. ब्रिदिंग टेस्ट, रक्ताच्या नमुन्यांची चाचणी व रक्त सीलबंद करण्यासाठी काही स्टॅण्डर्ड प्रक्रिया आहे का? त्यासंबंधी काही शासन निर्णय किंवा मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत का? याची आम्हाला तपशीलवार माहिती द्या, असेही निर्देश खंडपीठाने राज्य सरकारला दिले.रक्ताचे नमुने तातडीने तपासण्यासाठी नेण्यात येतात का? किती दिवस ते तसेच ठेवू शकता? ठरावीक कालावधीनंतर रक्त खराब होते का? ग्रामीण भागात रक्ताच्या नमुन्याच्या तपासणीबाबत काय, असाही सवाल खंडपीठाने सरकारला केला.