शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाची गाडी कधी येणार रुळावर ?

By admin | Updated: July 9, 2014 01:06 IST

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला असून अर्थसंकल्पात एकही महत्त्वाचा प्रकल्प विदर्भासाठी जाहीर करण्यात न आल्यामुळे

अपेक्षा भंग : एकही नव्या प्रकल्पाची घोषणा नाही नागपूर : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात विदर्भाच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला असून अर्थसंकल्पात एकही महत्त्वाचा प्रकल्प विदर्भासाठी जाहीर करण्यात न आल्यामुळे विदभार्ची गाडी कधी रुळावर येणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.मागील रेल्वे अर्थसंकल्पात रेल नीर बॉटलिंग प्लॉन्टची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार प्रवाशांना स्वच्छ आणि स्वस्त दरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रेल्वे करून देणार असल्यामुळे हा प्रकल्प प्रवाशांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. याशिवाय रेल्वेगाड्यात प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या चादर, बेडशीट स्वच्छ धुण्यासाठी मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीची घोषणा करण्यात आली होती. नागपूर-सेवाग्राम थर्डलाईनच्या कामालाही मंजुरी दिल्यामुळे भविष्यात नागपूरला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टिममुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्याची घोषणाही करण्यात आली होती. यात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा रेल्वेस्थानकावर बसविण्यात येणार आहेत. परंतु रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भाला ठेंगा दाखविण्याचा प्रकार केला आहे. विदर्भाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन नेहमीच देण्यात येते. त्यामुळे या अर्थसंकल्पात विदर्भासाठी एखादा मोठा प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. परंतु एकही प्रकल्प विदर्भाला न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात एखादा मोठा प्रकल्प जाहीर केल्यास विदर्भातील बेरोजगारी दूर होण्याची शक्यता होती. परंतु विदर्भाचा कुठलाच विचार न केल्यामुळे हा अर्थसंकल्प वैदर्भियांच्या अपेक्षा भंग करणारा ठरला आहे. (प्रतिनिधी)