शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी शेडची दुकानदारी थांबणार?

By admin | Updated: June 30, 2016 02:38 IST

पक्के बांधकाम करून त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याची दुकानदारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केली

नामदेव मोरे,

नवी मुंबई- पावसाळी शेडच्या नावाखाली पक्के बांधकाम करून त्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याची दुकानदारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केली आहे. पालिकेची दिशाभूल करून लाखो रुपये कमविण्याचा मार्ग बंद झाला असून, पोटभाडेकरूही गायब झाले आहेत. विनासायास पैसे मिळविण्याचा स्रोत थांबल्याने दुखावलेल्या व्यापाऱ्यांनी आता प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. व्यापाऱ्यांचे पावसामुळे नुकसान होवू नये यासाठी पावसाळी शेड उभारण्याची परवानगी देण्याचे धोरण पालिकेने निश्चित केले होते. या शेडचा कोणताही व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु हॉटेल व इतर व्यावसायिकांनी या शेडच्या नावाखाली सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून लाखो रुपये कमविण्यास सुरवात केली. हॉटेलच्या समोर व इतर बाजूला मोकळी जागा असल्यास तेथे पक्के शेड उभारण्यात येते. अनेक हॉटेलमध्ये अधिकृत जागेपेक्षा बाहेरील शेडमध्ये अधिक ग्राहक बसतील अशी रचना करण्यात आली आहे. शेडची मुदत संपली तरी ते हटविले जात नाही. पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेकांनी कायमस्वरूपी अतिक्रमण करून ठेवले होते. प्रत्येक हॉटेलचालकाने त्याच्या दुकानाच्या बाहेर पानटपरी तयार करून ती भाडेतत्त्वावर दिली आहे. >पावसाळी शेडचे वास्तव पावसाचे पाणी दुकानात येवू नये यासाठी पालिका प्रत्येक वर्षी पावसाळी शेडला परवानगी देते. परंतु या जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही. परंतु हॉटेल व इतर व्यावसायिक पक्के शेड तयार करून त्यामधून महिन्याला हजारो रुपये कमवितात. पानटपरी, पाणीपुरी, भाजी व फळ विक्रीसह इतरांना सार्वजनिक वापराची जागा भाडेतत्त्वावर दिली जात आहे. महापालिकेच्या धोरणांच्या पूर्णपणे विरुद्ध वापर केला जात असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेली भूमिका योग्यच असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. >दबावतंत्राचा वापर आयुक्तांच्या भूमिकेमुळे विनासायास होणारी कमाई थांबल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. पावसाळी शेडला व पर्यायाने सार्वजनिक वापराच्या जागेचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी महासभेच्या अधिकारावर घाला घातला जात असल्याची टीका सुरू झाली आहे. प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू असून आयुक्त त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अनेक व्यावसायिकांनी दुकानासमोरील जागा भाड्याने देवून महिन्याला २५ ते ५० हजार रुपये भाडे वसूल करण्यास सुरवात केली होती.पालिका आयुक्तांच्या कारवाईमुळे वर्षानुवर्षे सुरू असलेली ही दुकानदारी बंद झाली आहे. मार्जिनल स्पेसचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू आहे.व्यापाऱ्यांनी पावसाळा शेडला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केले आहेत. परंतु कोणालाही शेडसाठी परवानगी दिली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.