शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वीजगळती रोखणार!

By admin | Updated: May 10, 2015 02:52 IST

राज्यात सर्वत्र भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा उभी करून वीजचोरीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला ८ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्रालयाने केली

संदीप प्रधान, मुंबई

राज्यात सर्वत्र भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा उभी करून वीजचोरीला आळा घालण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला ८ हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी ऊर्जा मंत्रालयाने केली आहे. राज्यात सध्या सरासरी १४ टक्के वीजचोरी व गळती असून, १ टक्के वीजचोरी रोखली तरी राज्य सरकारचे २०० कोटी रुपये वाचणार आहेत.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मुंबईत पूर्णत: तर पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांत अंशत: भूमिगत वीजपुरवठा यंत्रणा आहे. याखेरीज राज्यात कुठेही अशी व्यवस्था नसल्याने आकडे टाकून वीजचोरी करणे, बेकायदा वीजजोडण्या घेणे असे प्रकार घडतात. भूमिगत वीजपुरवठ्याची व्यवस्था केल्यास खात्रीलायक वीजपुरवठा होतो. सध्या राज्यात सरासरी १४ टक्के वीजचोरी व गळती असल्याने १ हजार कोटी रुपयांचा फटका महावितरणला बसतो.याखेरीज राज्यातील १६ हजार फिडरकरिता फिडर व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. सध्या एका फिडरची सात एजन्सीवर जबाबदारी आहे. याच एजन्सी मीटर रिडिंग घेणे, बिले तयार करणे आदी कामे करतात. आता फिडर व्यवस्थापन समितीमध्ये पाच आयटीआय व एक बीई इलेक्ट्रीकल यांचा समावेश असेल व त्यांनी त्या फिडरमधून वीजचोरी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. जेवढी वीजचोरी ते रोखतील त्या प्रमाणात त्यांना मोबदला दिला जाणार आहे. राज्यातील एक हजार फिडरवर ४५ टक्क्यांपेक्षा जास्त वीजगळती असून, ८ हजार फिडरवर २० ते २५ टक्के वीजगळती आहे. ग्रामीण भागात ज्या फिडरवर ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती आहे त्या भागात भारनियमन केले जाते; तर शहरी भागात ४५ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असल्यास भारनियमन केले जाते.