शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भक्कम पुराव्यांसह बाजू मांडणार

By admin | Updated: October 6, 2016 05:39 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात भक्कम पुराव्यांसह प्रभावीपणे राज्य सरकार आपली बाजू मांडेल

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात भक्कम पुराव्यांसह प्रभावीपणे राज्य सरकार आपली बाजू मांडेल, असा विश्वास मराठा समाज आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.मराठा आरक्षणाबाबत १३ आॅक्टोबर रोजी उच्च न्यायलयात सुनावणी आहे. या संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण कृती समितीची बैठक झाली. बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. ए. थोरात, विशेष सरकारी वकील अभिनंदन वग्यानी आदी मान्यवर उपस्थित होते. उच्च न्यायालयात १३ आॅक्टोबरपासून मराठा आरक्षणाच्या याचिकांवर नियमित सुनावणी अपेक्षित आहे. या सुनावणींच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी सरकार आवश्यक ७० पुरावे सादर करणार आहे. त्याचप्रमाणे मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असून या समाजाची आर्थिकस्थिती बिकट आहे, हे सिद्ध करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाची सांख्यिकी माहिती न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. या सुनावणी दरम्यान राज्य सरकारची बाजू कोणत्या पध्दतीने मांडता येईल? कोणते भक्कम पुरावे सादर करण्यात येतील? त्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत घेतला, अशी माहिती तावडे यांनी दिली. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे हे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. कोणतेही मानधन न घेता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्यादृष्टीने ते सरकारची कायदेशीर बाजू मांडतील, असे तावडे यांनी स्पष्ट केले.