शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाची माहिती आयोगाकडे पाठवणार?

By admin | Updated: March 29, 2017 03:49 IST

मराठा समाज आजही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टीने मागासलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने

मुंबई : मराठा समाज आजही सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टीने मागासलेला आहे, हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकारने जमवलेल्या माहितीची छाननी व विश्लेषण मागासवर्ग आयोगाकडे करायचे की नाही, याबाबत उच्च न्यायालय बुधवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. सरकारने पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटच्या मदतीने जिल्हा पातळीवर माहिती जमा केली. या संस्थेने जमा केलेल्या माहितीवरून मराठा समाज मागासलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांना नोकरी व शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात घेतली आहे. या माहितीची छाननी व विश्लेषण करण्यासाठी संबंधित प्रकरण मागासवर्ग आयोगाकडे वर्ग करावे, अशी विनंती गेल्या सुनावणीत एका याचिकाकर्त्याचे वकील व्ही. एम. थोरात यांनी खंडपीठाला केली होती. राज्य सरकारने नव्याने जमा केलेली माहिती राणे समितीपुढे नव्हती, त्यामुळे ही माहिती निवृत्त न्यायाधीश एस. बी. म्हसे यांच्या अध्यक्षतेखालील मागासवर्ग आयोगाकडे विश्लेषणासाठी जाईल. त्यामुळे न्यायालयाला निष्कर्ष काढण्यास मदत होईल, असा युक्तिवाद अन्य एका याचिकाकर्त्यातर्फे मिहीर देसाई यांनी केला होता. आपल्याला याबाबत काहीच हरकत नाही, असे राज्य सरकारनेही खंडपीठाला सांगितले होते. मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी आक्षेप घेतला होता. अपवादात्मक स्थिती मानून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या राज्य सरकारच्या अर्जावर आयोग निर्णय घेऊ शकत नाही, असा युक्तिवाद संचेती यांनी केला होता. (प्रतिनिधी)