शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन कोटी झाडे जगविणार - रामदास कदम

By admin | Updated: April 8, 2016 02:44 IST

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलांचा वेध घेण्यासाठी राज्यात स्वतंत्र वातावरण बदल कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. तसेच आगामी काळात राज्यात दोन कोटी झाडे लावून ती जगविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणीय बदल आणि त्याच्या परिणामांबाबत भाजपाच्या शोभा फडणवीस यांनी अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती. वातावरणातील बदलामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होत आहे. गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते. तर, शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, जागतिक वातावरणात होत असलेल्या बदलाचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर होतो. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समाजाचा अन्नदाता शेतकरीच आज अन्नापासून वंचित होऊ लागला आहे. सदस्य राहुल नार्वेकर यांनीही याच भावना व्यक्त केल्या. या वेळी मंत्री कदम म्हणाले, वातावरणातील बदलाची समस्या जागतिक आहे. झाडे तोडली जातात. पण झाडे लावण्याचे काहीच नियोजन होत नाही. वृक्षारोपण केले जाते. पण त्यापैकी किती झाडे जगतात याचे आॅडिट होत नाही तसेच महामार्गांसाठी हजारो झाडांची कत्तल होते, अशावेळी नवीन झाडे लावल्यानंतरच जुनी झाडे तोडण्याची परवानगी देण्याची गरज आहे. वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी वनांचे आच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत असायला हवे. सध्या हे प्रमाण खूपच कमी आहे. ३३ टक्क्यांचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. (प्रतिनिधी)