शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

यार्डातच थांबलेली एसी लोकल चर्चगेटहूनच सुटणार?

By admin | Updated: January 4, 2017 01:44 IST

सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. एसी लोकलच्या जास्त असलेल्या उंचीमुळे मध्य रेल्वेने

मुंबई : सात महिन्यांपूर्वी मुंबईत दाखल झालेली एसी लोकल पश्चिम रेल्वेमार्गावर धावण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. एसी लोकलच्या जास्त असलेल्या उंचीमुळे मध्य रेल्वेने एसी लोकल चालवण्यास नकार दिल्यानंतर पश्चिम रेल्वेकडून ही लोकल चालवण्यासाठी चाचपणी केली जात होती. मात्र एसी लोकलच्या जादा उंचीमुळे चर्चगेट ते वांद्रेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे सांगण्यात येत होते. या तांत्रिक अडचणी सोडवणे शक्य असून, एसी लोकल चर्चगेटहूनच चालवली जाऊ शकते, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकूल जैन यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी याबाबतचा अंतिम निर्णय पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडूनच घेतला जाईल. रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने याची चाचपणी करण्यास सुरुवात केली. चर्चगेट ते वांद्रेदरम्यान मध्य रेल्वेप्रमाणेच अडचणी येत असल्याने त्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्याचा अहवालही पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापकांकडून मुख्यालयाकडे पाठविण्यात आला. जैन यांनी सांगितले की, चर्चगेट ते वांद्रेदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यात माहीम व माटुंगा येथे कमी उंचीच्या पुलाची तर महालक्ष्मी येथे ओव्हरहेड वायरची अडचण आहे. माहीम व माटुंगा येथील दोन्ही पूल तोडण्यात येणार असून, ते नव्याने बांधण्यात येतील. त्याचप्रमाणे महालक्ष्मी आणि परिसरात ओव्हरहेड वायरचीही कमी उंची आहे. त्या ठिकाणी रेल्वे रूळ खाली करून किंवा ओव्हरहेड वायर वर करून ही समस्या सोडवू शकतो. महालक्ष्मीपर्यंत अशा प्रकारच्या सहा समस्या आहेत आणि तेही सोडवून एसी लोकल चर्चगेटपासून चालवणे शक्य आहे. परंतु याबाबत पश्चिम रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, अंतिम निर्णय त्यांच्याकडूनच घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)