शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्टोन्मेंटचे प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: July 21, 2016 02:03 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात देहूरोड, खडकी, नाशिक, औरंगाबाद या भागातील सदस्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट

पिंपरी : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात देहूरोड, खडकी, नाशिक, औरंगाबाद या भागातील सदस्यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांशी कॅन्टॉन्मेंटच्या प्रश्नावर चर्चा झाली, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.कॅन्टोन्मेंट बोर्डाशी निगडित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लागावे म्हणून खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्लीतील साऊथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयामध्ये देहूरोड, खडकी, नाशिक, औरंगाबाद येथील सदस्यांसमवेत भेट घेतली. या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे, खासदार गोपाळ तुमाणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षा अरुणा पिंजण, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्ष सुरेश कांबळे, राहुल बालघरे, रघुवीर शेलार, सारिका नाईकनवरे, अमोल नाईकनवरे, हाजीमलंग मारुमुथ्थू, गोपाळ तंतरपाळे, विशाल खंडेलवाल आदी उपस्थित होते. देशामध्ये एकूण ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. त्यातील सात महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामधील पुणे, खडकी, देहूरोड हे तीन कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे जिल्ह्यामध्ये येतात. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या विविध समस्या या बैठकीमध्ये मांडल्या. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्व्हिस चार्जची कोट्यवधी रुपयांची रक्कम केंद्राकडे प्रलंबित असून, ती जर केंद्राने कॅन्टोन्मेंटला दिली तर कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरी विकास कामाला चालना मिळेल. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना या नगरपालिका व महानगरपालिका यांना लागू केल्या जातात त्या योजनांमध्ये बोर्डचा सहभाग करण्यात यावा. जेणेकरून बोर्ड हद्दीतील नागरिकांना याचा लाभ होईल. जिल्हा नियोजन समितीवर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या एका सदस्याला स्थान मिळावे, कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बांधकाम नियमावली ही जुनी आहे. (प्रतिनिधी)>बोपखेल येथून खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत होणारा नवीन रस्ता तत्काळ करण्याबाबत महापालिकेला सूचना कराव्यात. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील बोपखेल गावाकडून येणारा रस्ता पूर्णत: महानगरपालिकेने करावा. जवळपास पाऊण तास चाललेल्या या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी महाराष्ट्रातील कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.- श्रीरंग बारणे, खासदार